बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : येथील लिंगायत बोर्डिंग येथे जागतिक महिला दिनानिमित्त मैत्रीण मंच व महात्मा बसवेश्वर सार्वजिनक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत महिला व मुलींनी मोठ्या संख्येनी हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मागील दहा वर्षांपासून महिला दिनानिमित्त मैत्रिण ङ्कंच व महात्मा बसवेश्वर सार्वजिनक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींसाठी विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करुन महिहलांना विविध गुण प्रदर्शनासाठी व्यासपीठ निर्माण करुन देण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला पोलिस उपनिरीक्षक सुरेखा धस, शोभा पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. महिलांच्या बहुसंख्येने, जल्लोषात, टाळ्यांच्या कडकडात मैत्रीण मंचच्या नृत्यस्पर्धेस महिला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. चार वर्षाच्या विधी मुलगे हिच्या अग्गो बाई ढग्गो बाईने रसिकांना डोलायला लावले, मी सातार्याची गुलछडीवर ताल धरताना रिध्दीमा चाटे हिने रसिकांच्या टाळ्या मिळवल्या.
मैत्रीण मंचच्या संपूर्ण ग्रुपने खास मैत्रीणींच्या मनोरंजना साठी बसवलेल्या नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा, पैरो में बंधन है, पुंगी बजाके, राधा तेरी चुनतरी, माधुरी दिक्षीत फ्यूजन डान्स, मनरंगल दंगले या गीतावर कन्टेंटप्ररी डान्स विशेष करुन विवाहीत महिलांनी रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी, मला जाऊ द्या, मला जाऊ दया, चने के खेत में, चला जेजुरीला जाऊ या गाण्यांवर ताल धरला. नृत्य स्पर्धे सोबत खवय्येगीरींनी खाण्याच्या स्टॉलवर मनमुराद आनंद लुटला.
या स्पर्धेत यश संपादन केलेले कलाकार पुढीलप्रमाणे - लहान गट, खुला गट, विवाहीत महिला गट व समूह नृत्य गट अशा स्तरातून घेण्यात आल्या यात परितोषिक विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे - लहान गट प्रथम क्रमांक - शर्वरी सोपल, द्वितीय क्रमांक श्रेया माळगे. मोठा गट - प्रथम क्रमांक अपुर्वा चव्हाण, द्वितीय क्रमांक - साक्षी मुंढे, ग्रुप डान्स प्रथम क्रमांक - बालाजी ग्रुप, द्वितीय क्रमांक - नटखट ग्रुप, तृतीय क्रमांक कला ग्रुप. विवाहित महिला मध्ये प्रथक क्रमांक - सविता वायकर, द्वितीय क्रमांक - अंजली भागवत, तृतीय क्रमांक - भाग्यश्री राऊत.
पोलिस उपिनरीक्षक सुरेखा धस बोलताना म्हणाल्या, आता महिलांनी सक्षम बनायला हवे. कौटुंबिक, सामाजिक अन्य स्तरावर जर महिलांना त्रास होत असेल तर त्यांनी आमच्याकडे यावे आम्ही त्याची दखल घेवू असा आपल्या मनोगतातून दिलासा दिला.
मैत्रीण मंचच्या अध्यक्षा अरुणा मगनिरे म्हणाल्या की, बाबासाहेब मनिगरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या मैत्रीण मंचच्या रोपटयाला आज दहा वर्षे पूर्ण होत असून महात्मा बसवेश्वर सार्वजिनक वाचनालय व दादा कोरे यांचे नेहमीच सहकार्य लाभते, आपल्या मैत्रीणींची उत्स्फूर्त उपस्थितीतून आमचा उत्साह वाढतो. स्पर्धेच्या परिक्षक अँड. अंकिता सिंग, पल्लवी गादिया, पुनम शाहिर यांनी आपल्या मनोगतातून मैत्रीण मंचला शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेचे सूत्रसंचालन सौ. शिल्पा मठपती यांनी केले. तर आभार प्रदर्शन सौ. अरुणा मनिगरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय कोरे, मैत्रीण मंचच्या महिला प्रतिनिधी प्रभा बेणे, अपर्णा होनराव, माधुरी शिलवंत, स्वाती धारुरकर, सुवर्णा बेले, अरुणा कल्याणी, वंदना देवणे, शारदा पानगांवकर, उर्मिला निंबर्गीकर यांनी परिश्रम घेतले.