उस्मानाबाद -: विधी संघर्षग्रस्त बालकांची प्रकरणे निकाली काढण्याकरिता जिल्हयात बाल न्याय मंडळांची स्थापन करण्यात आली आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2000 या कायद्यांतर्गत या  बाल न्याय मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळावर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने 25 मार्चपर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
    या मंडळात महानगर दंडाधिकारी किंवा यथास्थिती प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आणि दोन सामाजिक कार्यकर्ते असतात. त्यापैकी किमान एक महिला सदस्य असते. या सामाजिक कार्यकर्त्यांना मुलांच्या संबंधातील आरोग्य, शिक्षण किंवा कल्याण कार्यक्रम यात किमान 7 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. हे मंडळ दंडाधिका-यांचे एक न्यायपीठ म्हणून कायद्यातील तरतुदीनुसार कार्य पाहते. सद्यस्थितीत कार्यान्वित असलेल्या बाल न्याय मंडळ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी उस्मानाबाद जिल्यातील नवीन नियुक्ती करावयाच्या अशासकीय सदस्यांची नामांकने सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.
         अर्जदारांनी वैयक्तिक माहिती (तपशिलवार व कालावधीसह ) देणे आवश्यक असून बालमानसशास्त्र व बालकल्याणचे विशेष ज्ञान असणे आवश्यक, मानसशास्त्र, गुन्हेगारीशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, गृहविज्ञानशास्त्र, शिक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, महिला विषयक अभ्यास, ग्रामविकास इत्यादी पैकी समाजविज्ञानाच्या कोणत्याही एका विषयातील किंवा विधी व औषधशास्त्र यातील पदवी धारण केलेली असावी. बाल न्याय मंडळाचे सदस्य यांना बालकांशी संबंधीत असणारे कायदे, आरोग्य, शिक्षण किंवा मुलांशी संबंधीत असणा-या  इतर पुनर्वसन  व विकास कार्याच्या क्षेत्रातील निदान सात वर्षाचा अनुभव असावा. बाल न्याय  मंडळाचे नामनिर्देशित करावयाचच्या सदस्यावर कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा, बालन्याय मंडळाचे सदस्यांचा दत्तक विषयक सेवांच्या प्रयोजनात कोणताही थेट संपर्क नसावा, पोलीस विभागाचे चारित्र्य प्रमाणपत्र सादर करावे, बाल न्याय मंडळाचे सदस्यांचे वय नियुक्तीवेळी 35 वर्षापेक्षा कमी व 65 वर्षापेक्षा अधिक नसावे, नोकरी करत असल्यास संबंधीत कार्यालय प्रमुखाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, अर्जदार व्यक्तीचे संमतीपत्र, विद्यमान सदस्य दोनवेळा बाल न्याय मंडळावर नियुक्तीस पात्र असतील, बाल न्याय मंडळाचे काम आठवडयातून किमान तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस चालू शकते. त्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणे आवश्यक राहील.
          वरील प्रमाणे परिपुर्ण तीन प्रतीत प्रस्ताव दि.25 मार्चपर्यत कार्यालयीन वेळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, प्रशासकीय इमारत,तळमजला,रुम नं.15,उस्मानाबाद येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  
 
Top