नळदुर्ग -: डिसेंबर 2012 मध्ये घेतले गेलेल्या जी.सी.सी. पुणे बोर्ड  टाईपरायटिंग च्या परीक्षेमध्ये विकास नाईक हा मराठी-30 गती परीक्षेत एकूण 100  पैकी 88 गुण मिळवून नळदुर्गमध्ये प्रथम आला आहे. विकास नाईक यास सोमेश्वर टाईपरायटिंगचे  सोमनाथ समन यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबददल त्‍याचे सोमेश्वर टाईपरायटिंग इन्स्टियूटचे संचालक सुभाष समन, परिवर्तन सामाजिक संस्थेचे मारुती बनसोडे, ज्ञानकिरण सामाजिक संस्थेचे भैरवनाथ कानडे, आधार संस्थेचे दयानंद काळुंके, रिपाइं चे तुळजापूर तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, प्रज्ञावंत संस्थेचे दादासाहेब बनसोडे, पत्रकार शिवाजी नाईक, सहशिक्षक जितेंद्र मोरखंडीकर, सुनील उकंडे आदींनी अभिनंदन केले आहे.
 
Top