नळदुर्ग -: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथे बुधवार रोजी हुतात्मा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी नागरिकांनी येथील चावडी चौकात हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहली. चावडी चौकात झालेल्या या कार्यक्रमात हुतात्माप्रेमी नागरिकांनी चावडी चौकाला यापुढे हुतात्मा चौक संबोधावे असे म्हटले आहे. नळदुर्ग शहरातील व्यापा-यांनी बाजारपेठ बंद ठेवून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी झालेल्या मराठवाडा मुक्ती आंदोलनात नळदुर्गचे बाबुराव बोरगावकर व निलय्या स्वामी यांना हौतात्म्य प्राप्त झाले होते. तेंव्हापासून नळदुर्ग शहरात दरवर्षी हुतात्मा दिन साजरा केला जातो. यावेळी प्रथमच शहरातील हुतात्माप्रेमी नागरिकांनी मुख्य चावडी चौकात हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन हुतात्मापुत्र विरय्या स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक कमलाकर चव्हाण, नगरसेवक संजय बताले, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष अशोक पुदाले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी मोरे, माजी पोलीस पाटील सुर्यकांत पाटील, माजी नगरसेवक ज्योतीबा येडगे, शहर शिवसेनाप्रमुख संतोष पुदाले, युवासेनेचे तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांच्यासह विविध गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थिती होती.