उस्मानाबाद :- महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नौ.नि.व क.) अधिनियम 1969 च्या अंतर्गत कायदयाचे उल्लंघन करणा-या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील 16 व्यापाऱ्यांविरुध्द लातूर येथील कामगार न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या  महालोक अदालतीमध्ये न्या. बी. डी. कुलकर्णी यांनी  रु. 300 ते रु. 600 पर्यंतच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. यात विशेषत: उमरगा, कळंब, मुरुम व लातूर येथील व्यापा-यांचा समावेश होता. संबंधित आडते व खरेदीदार यांच्यावर लातूर व उस्मानाबाद जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष तथा सहाय्यक कामगार आयुक्त, लातूर  एन. एन. ईटकरी, मंडळाचे सचिव व सरकारी कामगार अधिकारी लातूर पी. डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे ज्येष्ठ निरीक्षक एम.जी.राजेंद्र यांनी खटले दाखल करण्याची कार्यवाही केली होती.           
 
Top