उस्मानाबाद -: ग्राहक संरक्षणाच्या बाबतीत सर्वत्र जागृती व्हावी व  ग्राहकांचे हक्क व त्याचे संरक्षण व्हावे, यासाठी मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन दि. 30 मार्च रोजी करण्यात आले आहे. जागतिक ग्राहक दिनाचे  उदघाटन सकाळी 11-30 वाजता तहसीलदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख पाहूणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. एम. देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ग्राहकांचे हक्क्‍ व त्यांचे संरक्षण याबाबत मार्गदर्शन व चर्चासत्र महसूल भवन, तहसील कार्यालय, उस्मानाबाद येथे होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार श्री. ज्ञा. माने यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.              
 
Top