उस्मानाबाद :- जमनालाल बजाज फाऊंडेशनतर्फे ग्रामीण विकासासाठी, विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, क्षेत्रातील भरीव किंवा विशेष उल्लेखनिय कार्यासाठी, महिला व बाल विकास क्षेत्रातील कार्य, (श्रीमती जानकीदेवी बजाज यांचे स्मरणार्थ), आंतरराष्ट्रीय पुरस्कार व भारताबाहेर महात्मा गांधी यांचे विचारांचा प्रचार करण्यासाठी पुरस्कार दिला जातो. प्रत्येक पुरस्कारासाठी स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र, व रोख रक्कम (रु.5 लाख रुपयाचे ) पुरस्काराचे स्वरुप आहे.
         राष्ट्रीय पुरस्काराबाबत नमुना अर्ज अटी व शर्ती व इतर अनुषंगिक माहिती Jamnalal Bajajfoundation.org/aards/nomination forms या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.अधिक माहितीसाठी या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय खोली क्र.15 तळमजला प्रशासकीय इमारत,उस्मानाबाद कार्यालयाशी सपंर्क साधावा. सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव दरवर्षी माहे डिसेंबरअखेरपर्यंत आयुक्तालयास अथवा परस्पर जमनालाल बजाज फाऊंडेशन, मुंबई यांचेकडे चार प्रतीत सविस्तर परिपूर्ण सादर करावा, मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांनी कळविले आहे.   
 
Top