
या कालावधीत औरंगाबाद-सोलापूर-विजापूर या मार्गे ये-जा करणा-या एस.टी.बसेस तसेच इतर प्रवासी वाहने सरमकुंडी फाटा,भूम,बार्शीमार्गे सोलापूर अशी ये-जा करतील. औरंगाबाद –उस्मानाबाद-सोलापूर या मार्गे ये-जा करणाऱ्या एस.टी.बसेस व इतर प्रवासी वाहने इंदापूर गाव,परतापुर फाटा, मोहा, येडशीमार्गे ये-जा करतील. कळंब-बार्शी या मार्गावरील येरमाळा मार्गे होणारी वाहतूक ढोकी,येडशी मार्गे वळविण्यात आली आहे.
उस्मानाबाद-औरंगाबाद या मार्गावरील जडवाहतूकीतही बदल करण्यात आले आहे.औरंगाबादहून हैद्राबादकडे ये-जा करणारी वाहने मांजरसुंभा, केज, कळंब, ढोकी चौरस्ता,आळणीफाटा या मार्गे अथवा ढोकी चौरस्ता, औसा, किल्लारी, उमरगा चौरस्ता या मार्गे ये-जा करतील. उस्मानाबाद-औरंगाबाद या मार्गावरील जडवाहने आळणीफाटा, ढोकी चौरस्ता, कळंब, केज, मांजरसुंभामार्गे ये-जा करतील.
या वाहतूक बदल मार्गातून सर्व प्रकारचे शासकीय वाहने तसेच महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तींची वाहने तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेसाठी उपयोगात आणलेली वाहने यांना वगळण्यात आल्याचे कळविण्यात आले आहे.