उस्मानाबाद :- क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने उन्हाळयात दिर्घकालीन शालेय, महाविद्यालयीन सुटीचा सदुपयोग होण्यासाठी राज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. युवा वर्गाला लाभ होण्यासाठी उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीर उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अनिल देशपांडे यांनी दिली.
       या माध्यमातून युवा वर्गाला शरीर संवर्धनाचे महत्व कळावे, क्रीडा क्षेत्रासाठी  आवश्यक कौशल्य प्राप्त ( कॅच देम यंग ) नवोदीत विद्यार्थीही प्राप्त होवू शकतील तसेच निवोदीत खेळाडूना अत्याधुनिक क्रीडा सुवीधांची माहिती व्हावी यादृष्टीने हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
       या    शिबीराचा पहिला टप्पा   दिनांक 21  एप्रिल रोजी सुरु झाला. दुसरा टप्पा 6 ते 20 मे 2013 या कालावधीत असणार आहे. त्यासाठी निवासी शुल्क 5 हजार 500 रुपये तर अनिवासी शिबीर शुल्क 4 हजार 500 रुपये आकारले जाणार असून हे शिबीर शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे- 45 येथे  भरणार आहे. आठ ते 12 वर्षे वयोगटातील (मुले-मुली) व 13 ते 18 वयोगट (मुले-मुली) यांना यात सहभागी होता येईल.
      या शिबीरात खेळ :- अँथलेटिक्स. स्वीमींग, जिम्नेटिक्स, फुटबॉल, हॉकी, टेबल टेनिस, सायकलींग, शुटींग, बॅडमिंटन, ज्युदो, सेल्फ डिफेन्स, बौध्दीक व मनोरंजनात्मक खेळाचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 

अधिक माहितीसाठी संपर्क :- शिवछत्रपती क्रीडा संकुल.म्हाळुंगे –बालेवाडी. पुणे.45 अँथलेटिक्स स्टेडियम  ( क्रीडा मार्गदर्शन प्रशिक्षण व संशोधन विभाग )  ईमेल dsysdesk13@gmail.com  आणि कार्यालय क्रमांक 020-27390234 येथे संपर्क साधावा. या शिबीरात आपल्या जास्तीत जास्त खेळाडूनी सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
 
Top