नळदुर्ग -: राष्‍ट्रीय महामार्ग रस्‍ता ओलांडणा-या एका इसमास समोरुन ट्रकने जोराची धडक दिलेल्‍या जागीच ठार झाल्‍याची घटना दि. 11 मे रोजी सकाळी सहा वाजण्‍याच्‍या सुमारास नळदुर्ग येथील पाटबंधारे कार्यालयासमोर घडली.
    लक्ष्‍मण गेमू राठोड (वय 55, रा. आचलेर, ता. उमरगा) असे अपघातात मरण पावलेल्‍याचे नाव आहे. यातील मयत लक्ष्‍मण राठोड हे प्रांतविधी उरकून घराकडे जाण्‍यासाठी महामार्ग ओलांडत असताना हैद्राबादहून औरंगाबादकडे जाणा-या भरधाव अज्ञात ट्रकने त्‍यांना जोराची धडक दिली. त्‍यात ते जागीच मरण पावले. याप्रकरणी अमृता भिमराव चव्‍हाण यांनी नळदुर्ग पोलिसात खबर दिल्‍यावरुन आकस्‍मात मृत्‍यूची नोंद करण्‍यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख हे करीत आहेत.
 
Top