नळदुर्ग  -: येथील रामतीर्थ येथे राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाच्‍यावतीने दि. 11 एप्रिलपासून चारा छावणी सुरु करण्‍यात आली आहे. या चारा छावणीला देवगिरी (मराठवाडा) विभागाचे राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे सेवा विभागप्रमुख मोहन गर्जे व देवगिरी (मराठवाडा) विभागाचे संघचालक चंद्रकांत चौधरी यांनी नळदुर्ग येथील जनावरांच्‍या चारा छावणीला दि. 11 मे रोजी सायंकाळी सात वाजता भेट देवून चारा छावणीची पाहणी केली.
    येथील जनावराच्‍या चारा छावणीमध्‍ये 60 गावातील 35 शेतक-यांची 30 जनावरे दाखल झाली असून या जनावरांना तीनवेळा चारा दिला जात असून जनावरांची पशुतंत्राकडून वेळोवेळी तपासणी करुन गरजेनुसार मोफत लसीकरणही केले जात आहे. या चारा छावणीसाठी शासनाकडून कसलीही मदत घेतली जात नसून याचा भार डोंबवली नागरिक अर्बन बँक यांनी उचलला आहे. या चारा छावणीसाठी स्‍थानिकचे राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉ. सात्विक शहा, सेवानिवृत्‍त मुख्‍याध्‍यापक बलभीम मुळे, सुधीर पोतदार, सुशांत भूमकर, चंद्रकांत महाबोले, गुरुनाथ कर्पे आदीजण परिश्रम घेत आहेत.
    या चारा छावणीमधून जनावरांची देखभाल चांगल्‍याप्रकारे होत असल्‍याने त्‍यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
 
Top