उस्मानाबाद :- परिचारिकांवर सुरक्षित सेवेची जबाबदारी असते. कठीण प्रसंगातही त्यांना सेवा वृत्तीने काम करावे लागते. वेळेचे भान न ठेवता केव्हाही कामास हजर रहावे लागते. त्यांचे कार्य काळजी घेण्याचे आहे. नवीन पिढीच्या सुरक्षित सेवेची जबाबदारी त्यांच्यावर असल्याने त्यांचे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे, असे प्रतिपादन जिल्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी फ्लोरेंस नाईटिंगेल पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले. 
    उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास जि.प. चे अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, जनता बँकेचे चेअरमन मोदाणी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी  हाशमी, रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतीफ उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की,रुग्णालयास सगळया सुविधा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सर्वाशी चर्चा करुन सर्वजण मिळुन रुग्णालय अद्यावत करण्याचे प्रयत्न करु.
    हे पुरस्कार पालकमंत्री चव्हाण व सर्वांच्या हस्ते देण्यात आले. पुरस्कार ए. एन.एम संवर्ग, एल.एच.व्ही. संवर्ग,अधिपरिचारिका ते अधिसेविका संवर्ग या तीन संवर्गासाठी प्रथम, व्दीतीय, तृतीय व उत्तेजनार्थ पुरस्कार होते. तसेच नर्सिंग कौंसिलच्या ए.एन.एम. च्या परिक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम आल्यामुळे कु.कोमल पवार या विद्यार्थिनीचा सत्कार पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
    दिवा म्हणजे सेवा व निष्ठेचे प्रतिक. आपणही त्याची  बांधीलकी घेतली आहे. सेवाभाव हा जीवनाचा मोठा भाग आहे. माणसात नेहमी प्रगती सुरु असते. आपणास अपुर्णत्वाकडून पुर्णत्वाकडे जावयाचे आहे.  रुग्णालय वैद्याकिय महाविद्यालयाची संकल्पना पुर्ण करु. त्यासाठी जागा उपलब्ध करुन देऊ असे या प्रसंगी बोलताना डॉ. व्हट्टे म्हणाले.
    यावेळी बोलताना दुधगावकर म्हणाले की, रुग्णालयाची नवीन वास्तू लवकरच उभी राहील. अशा वेळी मदतीसाठी जिल्हा परिषद सदैव तयार आहे. परिचारीका डॉक्टर येण्याअधीपासूनच कामावर आलेल्या असतात. त्यांना पुरस्कार दिला जातो ही चांगली गोष्ट आहे परंतू त्यांनी पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्याविषयी सुचविले.
    सुरुवातीला बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक धाकतोडे म्हणाले की, रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध झाला असून जून महिन्यापासून जुन्या इमारतीच्या जागी नवीन इमारतचे बांधकाम सुरु होईल. तसेच रुग्णालयात चार डायलिसिस मशिन प्रात्प झाल्या असून त्या लवकरच कार्यान्वीत होतील. जळीत वॉर्ड ही वाढवण्याची प्रकीया सुरु आहे.
    प्रास्ताविकात विमल पानसे यांनी फ्लोरेंस नाईटिंगेल यांची माहिती सांगीतनी. अब्दुल लतीफ यांनी मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांना दिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुमित्रा गोरे यांनी केले. याप्रसंगी डॉक्टर, परिचारिका रुग्णालयाचे कर्मचारी व नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    ए.एन.एम. संवर्गात श्रीमती डोके के.बी. प्रथम, श्रीमती देशमुख एस.एन. व्दितीय तर श्रीमती सुतके एस.के यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. एल.एच.व्ही. संवर्गात श्रीमती राजापूरे एस.पी.  प्रथम, श्रीमती धरणे एस.पी. व्दितीय तर श्रीमती काझी यु.एम. यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला.  या दोन्ही संवर्गासाठी  उत्तेजनार्थ पुरस्कार श्रीमती जाधव के.एम., श्रीमती पटेल बी.आर. व श्रीमती चव्हाण कंत्राटी यांना देण्यात आले. अधिपरिचारिका ते अधिसेविका संवर्गात श्रीमती भड एस.एम. प्रथम, श्रीमती मोरे एस.ए. व्दितीय तर श्रीमती दलभंजन एम.ए.यांना तृतीय पुरस्कार देण्यात आला. या संवर्गात उत्तेजनार्थ पुरस्कार श्रीमती गोरे एस.एल., श्रीमती कठारे एम.ए., श्रीमती जावळे एस.डी., श्रीमती गवई एस.एस., श्रीमती खटके एम.पी., श्रीमती चव्हाण ए.व्ही., श्रीमती काळे एस.एस. यांना देण्यात आले.
 
Top