बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी कामगार दिनाचे औचित्‍य साधून मेळाव्‍याचे आयोजन केले व यामध्‍ये चिठ्ठया टाकून लकी कुपनद्वारे 101 कामगारांच्‍या मुलींसाठी विवाह निधी म्‍हणून प्रत्‍येकी 51 हजार रुपयांचा धनादेश मोफत देण्‍यात आला. लकी कुपनद्वारे 21 कामगारांना मोफत सायकलचे वाटप करण्‍यात आले. कामगारांना भविष्‍य निर्वाह निधी, ओळखपत्र, 100 खोरे, 100 टिकाव, 100 पाट्या इत्‍यादी वस्‍तूंची भेट कामगार दिनानिमित्‍त देत लोकांच्‍या प्रश्‍नासाठी जागृत असल्‍याची जाणीव करुन दिली आहे.
    ज्‍यांच्‍याबरोबर दोन शब्‍द बोलायला कुणाला वेळ नाही, त्‍यांच्‍या समस्‍या सोडविण्‍यासाठी भाऊसाहेब आंधळकर यांनी स्‍वतःचा फॉर्मुला तयार केला असून कष्‍टकरी समाजाच्‍या एकत्रिकरणाला सुरुवात केली आहे. शिव-बसव-भिमशक्‍ती हमाल, माथाडी व जनरल कामगार संघ, महाराष्‍ट्र राज्‍य (ट्रेड युनियन) च्‍या नावाची संस्‍था स्‍थापन करुन त्‍यांनी वंचित अशिक्षितांना न्‍याय मिळवून देण्‍यासाठी प्रयत्‍न केले आहेत. जे जे नवीन आणि आवश्‍यक ते ते आंधळकर यांनी करुन दाखविले, असा विश्‍वास आता बार्शीकरांना वाटू लागला आहे. हे करतो आणि ते करणार असा केवळ आभास निर्माण करुन वर्षे लोकांचा विश्‍वासघात करुन राज्‍य करणा-यांना उत्‍तरादाखल आंधळकर यांनी वेगळ्या स्‍वरुपात लोकोपयोगी कामे करुन चपराक दिली आहे.
    शिवसेनेच्‍यावतीने दुष्‍काळग्रस्‍तांना 21 टँकरद्वारे पाणी पुरवठ्याच्‍या माध्‍यमातून सातत्‍याने मदत करीत जनावरांच्‍या पिण्‍याचाही प्रश्‍न सोडविला आहे. मागच्‍या महिन्‍यातच दुष्‍काळाच्‍या झळांचे दुःख विसरण्‍यासाठी माता बहिणींसाठी प्रसिध्‍द भावजी व खेळ पैठणीचा हा क्रांती नाना माळेगावकर यांचा होम मिनिस्‍टर हा कार्यक्रम सादर केला. जनावरांच्‍या चा-याची सोय करीत याच्‍या बदल्‍यात कोणाकडून कसलीही अपेक्षा आंधळकर यांनी ठेवली नाही. कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती, नगरपरिषदेच्‍या निवडणुकीत शिवसेनेच्‍या उमेदवारांना उभे करुन आपला पक्ष हा कायमस्‍वरुपी एकमेव कट्टर विरोधक असल्‍याची जाणीव करुन दिली आहे.
    यापुढील काळात वृध्‍दांसाठी वृध्‍दाश्रम, 50 निराश्रीत मुला-मुलींसाठी दत्‍तक योजना, वृध्‍द व्‍यक्‍तींना काशी, रामेश्‍वर, अजमेर शरीफ दर्गा, चैत्‍य भधमी या तीर्थक्षेत्राचे मोफत दर्शन, वृध्‍दांना निराधार योजनेतून पेन्‍शन, विद्यार्थ्‍यांना दरमहा पॉकेटमनी, महिलांसाठी गृहउद्योग, प्रशिक्षण शिबीर, विविध कोर्सेस, शहर व तालुक्‍यातील 30 हजार कुटूंबाना अल्‍प दरात धान्‍य वाटप आदी योजना राबविण्‍यात येणार आहेत. तुमच्‍यावर अन्‍याय होत असेल, काही अडचणी असतील तर शिवसेनेच्‍या माध्‍यमातून आपण त्‍या सोडवू, असा विश्‍वास देत आंधळकर यांनी समाजकार्यात आपले पाय रोवले आहेत.
    सुरुवातीच्‍या काळात त्‍यांना काही माणसे ओळखता आली नाहीत. सामाजिक अनुभव भरपूर असला तरी त्‍यांचा राजकीय अभ्‍यास म्‍हणावा तेवढा नव्‍हता, त्‍यामुळे सुरुवातीचा काळ त्‍यांना काहीसा कठीण गेला. त्‍यांच्‍या या गोष्‍टींचा विरोधी राजकीय पक्षातील लोकांनी गैरफायदा घेतला. काही कालावधी गेल्‍यावर त्‍यांनी आपल्‍या कार्यपध्‍दतीमुळे बदल घडवत सर्वसामान्‍यांसाठी आपण कार्य करण्‍यापासून कदापिही डगमगणार नाही, असे पुन्‍हा ठणकावून पुन्‍हा सांगत आपले समाजकार्य सुरुच ठेवले आहे. अनेकांमुळे त्‍यांची बदनामी झाली असली तरीही त्‍यांनी काढता पाय घेतला नाही. शिवसेनेला त्‍यांच्‍या स्‍वरुपात एक चांगला कार्यकर्ता व नेता मिळाला आहे. त्‍यांच्‍यावर तालुक्‍याची जबाबदारी हळूहळू येत त्‍यांनी अनेक गावांमध्‍ये विखुरलेल्‍या शिवसैनिकांची मोळी बांधण्‍याला सुरुवात केली आहे. गाव, वाडी, वस्‍ती येथे शिवसेनेची शाखा स्‍थापन करण्‍याचा विडा उचलून त्‍यांनी राजकीय आखाड्यात पदार्पण केले आहे.
 
Top