नगराध्यक्षा सौ. प्रतिभा मनोज सपाटे यांनीही रक्तदान केले.  
सांगोला :- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल प्रा. प्रबुध्दचंद्र झपके यांच्या 59 व्या वाढदिवसानिमित्त सांगोला, नाझरा व कोळा येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 1059 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
      दरवर्षीच होणार्‍या या रक्तदान शिबिरात रक्तदाते मोठ्या संख्येने रक्तदान करतात. सांगोला विद्यामंदिर, लायन्स क्लब, लिओ लायन्स क्लब परिवाराच्यावतीने दरवर्षीच हे रक्तदान शिबिर भरवण्यात येते. या शिबिरात होणार्‍या रक्तदानाचा आकडा आजपर्यंत इतर कोणत्याही संस्थेने ओलांडलेला नाही. आज दि. 21 रोजी झालेल्या शिबिराचा शुभारंभ तहसीलदार नागेश पाटील, पोलीस निरिक्षक दयानंद गावडे, मुख्याधिकारी धैर्यशिल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा सपाटे, प्रा. प्रबुध्दचंद्र झपके, ऍड. उदयबापू घोंगडे, ऍड. नागेश खर्डीकर, चंद्रशेखर अंकलगी, मुख्याध्यापक ब.बा.लिगाडे, शिक्षक, शिक्षिका, नगरसेवक उपस्थित होते. शिबिरात अक्षय रक्तपेढी सोलापूर, आचार्य श्री तुलसी रक्तपेढी जयसिंगपूर, जीवनरेखा रक्तपेढी जत, सिध्देश्वर रक्तपेढी सोलापूर यांच्यावतीने रक्त संकलित करण्यात आले. या रक्तदान शिबिरात महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनींनीही मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे रक्तदानासाठी सहभाग नोंदविला.
 
Top