उस्मानाबाद -: उन्हाळयात चारा, पाण्याअभावी जनावरांचे कूपोषण होते. त्यांची प्रकृतीही ढासळल्याने जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जनावरे, शेळया, मेंढया घटसर्प, फऱ्या, पी.पी. आर, आंत्रविषार आदि साथीच्या रोगास बळी पडण्याची शक्यता वाढते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी शेतकरी व पशुपालकांनी या साथीच्या रोगापासून जनावरे रोगमुक्त करुन राष्ट्रीय संपत्तीचे जतन करावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. भोसले यांनी केले आहे.
या साथीच्या रोगापासून बचाव करण्यासाठी संबंधितांनी पावसाळया्पूर्वी रोग प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे. मागील काही वर्षापासून जिल्हयात जनावरांना मोठया प्रमाणात फऱ्या व घटसर्प आणि लाळखरकुत रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून आल्याने कोंबड्यांना मानमोडी, देवी, लासोटा आदि रोगाचे प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.
लसीकरणासाठी प्रतिजनावरांस नाममात्र एक रुपया सेवा शुल्क असून शेतकरी व पशुपालकांनी आपल्या नजीकच्या पशुवैद्यकिय दवाखान्यात जनावरांस लसीकरण करुन घ्यावे. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अँस्कॅड व एफ एम डी सी पी आणि एनसीपी/ पीपीआर योजनेंअंतर्गत सदरील प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे कळविण्यात आले आहे.