सांगोला -: दुष्काळाने मानवासह वन्य प्राणीही सैरभैर झाले आहेत. अशातच एका सैरवैर झालेल्या 4 वर्षाच्या काळविटाचा भ्यायल्याने मृत्यू झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील हंगिरगे येथील काळेवाडी येथे मंगळवार दि. 21 मे रोजी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी की, सांगोला येथील हंगिरगे-पारे रोडवरती सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास काळेवाडी हद्दीतील दक्षिणेकडून उत्तरेकडे सैरभैर होऊन धावत जाणारे काळवीट रस्त्याकडेला काही अंतरावरती गतप्राण झाले होते. या गावात ही घटना घडल्यानंतर येथे बघ्यांची गर्दी झाली होती. त्याचवेळी काळेवाडी येथील बाबुराव पुकळे यांनी वनरक्षक सुभाष बुरुंगले यांना या घटनेची कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. या काळविटाचे जवळा पशुवैद्यकीय दवाखाना डॉ. एस.पी.सावंत यांनी शवविच्छदन केले. शवविच्छेदनामध्ये भ्यायल्याने मृत्यू झाला असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. वनरक्षक सुभाष बुरूंगले, वनमजूर संजय गायकवाड, रामा करताडे, सदाशिव मेसकर यांनी त्या काळविटावर वनविभागाच्या हद्दीमध्ये अंत्यसंस्कार केला.