परंडा -: सुजितसिंह ठाकूर यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्‍यात आली आहे. त्‍यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी शहरात फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
   परंडा तालुक्याचे सुपुत्र सुजितसिंह ठाकूर यांनी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, त्यानंतर सरचिटणीस, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, दोनवेळा प्रदेश चिटणीस तसेच महाराष्ट्रातील संघटनात्मक निवडणुकीत साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्यांना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदाची जबाबदारी दिली आहे. ठाकूर यांच्‍या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष अँड. संतोष सूर्यवंशी, 
गोपाल ठाकूर, विकास कुलकर्णी, राजाभाऊ चौधरी, संदिप शहा,  अजित पाटील, चंद्रकांत पवार यांच्‍यासह भाजप कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला आहे.
 
Top