वॉशिंग्‍टन -: अमेरिकेत ओक्‍लाहोमा शहराजवळ भीषण चक्रीवादळाने थैमान घातले. आतापर्यंत चक्रीवादळाने 91 जणांचा बळी घेतला असून विविध अपघातात 21 जण जखमी झाले आहेत.
    ओक्‍लाहोमाला भीषण चक्रीवादळाने तडाखा दिला. ओक्‍लाहोमासोबतच टेक्‍सासपासून मिनेसोटापर्यंत वादळाचा प्रभाव होत्‍या. परंतु, ओक्‍लाहोमा, कंसास आणि आयोव्‍हा ही शहरे वादळाच्‍या केंद्रात अडकली. ओक्‍लाहोमामध्‍येच 4 वादळे धडकली. कंसासमध्‍ये वादळ, मुसळणार पावसाने हेदोस घातला. त्‍यामुळे कंसासमध्‍ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला होता. तर काही जणांनी कंसासमध्‍ये वादळाचा पाठलाग करण्‍याचा प्रयत्‍न केला. याची मोठी किंमत त्‍यांना मोजावी लागली. वादळाची छायाचित्रे काढण्‍यासाठी काही जण प्रयत्‍न करत होते. परंतु, वादळाने अचानक दिशा बदलली आणि त्‍यांच्‍याच दिशेने वादळ सरकू लागले. त्‍यामुळे घाबरून सर्वजण पळाले. चक्रीवादळामुळे अनेक घरे जमीनदोस्‍त झाली. सर्वत्र हाहाकार माजला.
 
Top