मुंबई -: सन 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या काळात बेकायदा घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला अभिनेता संजय दत्तचे तुरुंगात जाण्यापूर्वी पाली हील्स भागातील त्याच्या राहत्या घरी सेलिब्रिटी मित्रांसोबत देवाची आराधना केली. होमहवनही केला. संजयच्या घराबाहेर त्याच्या चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.
संजय दत्त आज (गुरुवारी) दुपारी टाडा कोर्टासमोर आत्मसर्मपण करण्यासाठी त्याच्या राहत्या घरातून बाहेर पडणार आहे. सूत्रांनी सांगितले की, संजयला पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवले जाणार आहे. तुरुंगात 'कैदी नंबर सी 15170' असणार आहे.
संजयच्या जीवाला धोका आहे. त्याला मारण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र आर्थर रोड तुरुंगात आले होते. त्यामुळे संजयचे घराचा परिसरासह ऑर्थर रोड तुरूंगाच्या सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
'पाली हिल' स्थित संजूबाबाचे घर 'इंपीरिअल हाइट्स' बाहेर मोठा संख्येने पोलिस तैनात करण्यात आले आहे. यात पाच महिला पोलिसांचा समावेश आहे. विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार सकाळपासून उपस्थित झाले आहेत.
टाडा कोर्टात बुधवारी संजय दत्तच्या वकिलांनी अर्ज दाखल करून याच कोर्टात तो आत्मसर्मपण करेल, अशी माहिती कोर्टाला दिली. संजय कोर्टास शरण आल्यानंतर त्याला ऑर्थररोड कोर्टाचे अधिकारी ताब्यात घेतील. त्यांनीत त्याला कोठडीत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची पुण्यातील येरवडा तुरुंगात रवानगी केली जाण्याची शक्यता आहे.
या प्रक्रियेला उशीर झाला तर कदाचित संजयला आजची रात्री ऑर्थर रोड तुरूंगातच काढावी लागणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे.
संजय दत्त आत्मसर्मपण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी संजयच्या घराबाहेर जोरदार निदर्शने करत त्याला तुरूंगात पाठविण्याची मागणी केली. तर दुसरीकडे अतिशय जवळचा मित्र असलेल्या अभिनेता अजय देवगणने संजयची भेट घेऊन त्याला धीर दिला.
दरम्यान, 1993 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटाच्या काळात बेकायदा घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती.

(* साभार : दिव्यमराठी)