कळंब  -: वाशी तालुक्‍यातील मौजे तांदुळवाडी येथे सर जमशेदजी टाटा ट्रस्‍ट मुंबई व पर्याय संस्‍था कळंब यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने जनावरासाठी पाणपोई सुरु करण्‍यात आली असून या पाणपोईचे उदघाटन बुधवार दि. 15 मे रोजी करण्‍यात आले.
      तांदुळवाडी (ता. वाशी) येथे जनावरांकरीता सहा हौद ठेवण्‍यात आले असून त्‍यामध्‍ये दररोज टँकरद्वारे पाणी सोडण्‍यात येत आहे. या पाणपोईचे उदघाटन बुधवार रोजी सरपंच सतीश गाढवे यांच्‍या हस्‍ते श्रीफळ वाढवून करण्‍यात आले. यावेळी ग्रामसेवक आर.एन. वाघमारे, विलास चौधरी, फुलचंद चौधरी, पर्याय संस्‍थेचे विलास गोडगे, भिकाजी जाधव, पत्रकार प्रताप भायगुडे यांच्‍यासह शेतकरी उपस्थित होते.
      मौजे कवडेवाडी (ता. वाशी) येथेही जनावरांच्‍या पाणपोईची सोय करण्‍यात आली आहे. यासाठी कवडेवाडी येथील पोलीस पाटील मनीषाताई कवडे, आशाताई घोलप, महिला बचत गटाच्‍या सर्व सदस्‍य परीश्रम घेत आहेत. तसेच भूम तालुक्‍यातील मौजे रामकुंड येथे पाणपोईसाठी सहा टाक्‍या ठेवण्‍यात आल्‍या आहेत. त्‍यासाठी रमाई देवी महिला बचत गटाच्‍या अध्‍यक्षा मनिषाताई मुजरे, पदमीन चंदनशिवे तसेच इतर तीन महिला बचतगटातील सर्व सदस्‍य यासाठी परिश्रम घेत आहेत. त्‍याचबरोबर नळीवडगाव (ता. भूम) येथे जनावरांच्‍या पाणपोईची सोय करण्‍यात आली असून त्‍यासाठी सरपंच रामदास पाटील, उपसरपंच कैलास हजारे, बचत गटाच्‍या सदस्‍या सुनिता सकट, अन्‍नपूर्णा जाधव हे परिश्रम घेत आहेत. अंतरवली (ता. भूम) येथील सखुबाई गायकवाड, ग्रा.पं. सदस्‍य जयराम डोके, पर्यायचे कार्यकर्ते बालाजी शेंडगे, हर्षल शिंदे, इंदू भालेराव, प्रमिला राख, जनाबाई गायकवाड, मंगल गवळी, मीरा पवार या परिश्रम घेत आहेत. जनावरांसाठीच्‍या पाणपोईमुळे जनावरांच्‍या पिण्‍याचा प्रश्‍न मिटला असून याबाबत ग्रामस्‍थाकडून पर्याय संस्‍थेचे आभार मानले जात आहे.
 
Top