मुंबई -: एकीकडे क्रिकेटर श्रीसंतला अटक झाली आहे तर, बॉलिवूड अभिनेता संजय दत्त टाडा कोर्टासमोर शरण येण्यासाठी 15 कारचा काफिला घेऊन घरून निघाला आहे. त्याच्यासोबत पत्नी मान्यता आहे. कोर्टासमोर शरण आल्यानंतर त्याची शारीरिक चाचणी होईल त्यानंतर त्याला जेलमध्ये रवाना केले जाणार आहे.
गुरुवारी सकाळपासून त्याच्या घरी बॉलिवूडच्या कलाकारांनी भेटीसाठी रांग लावली आहे. तो पाली हिल येथील इंपिरिअल हाईट्स या त्याच्या घराबाहेर पडला तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणात त्याचे चाहते हजर होते. सुत्रांच्या माहितीनुसार त्याला पुणे येथील येरवडा जेलमध्ये ठेवण्यात येणार असून त्याला तिथे कैदी क्रमांक 15170 मिळेल.