नळदुर्ग -: किरकोळ कारणावरुन एका शेतक-याने आपल्या शेतातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हंगरगा (नळ) ता. तुळजापूर शिवारात सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.
दयानंद गंगाराव कांबळे (वय 35, रा. भीमनगर, हंगरगा नळ, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. यातील दयानंद कांबळे पत्नीसह शेतात गेले होते. त्यांची पत्नी जळणाचा भारा घेऊन घराकडे गेली असता, दयानंद यांनी बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जळणाचा भारा घरी ठेवून परत शेतात त्याची पत्नी आली असता त्यावेळी उघडकीस आली. ही घटना मंगळवार दि. 14 मे रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली.