प्रतिकात्मक
बारामती : शहरातील डॉ. जे.जे. शहा यांच्या जिवराज हॉस्पिटलमध्ये एका महिलेने चार अपत्यांना जन्म दिला आहे. यामध्ये तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. या नवजात बालकांची प्रकृती उत्तम असून, या परिसरातील ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. ज्योती भास्कर चव्हाण (रा. बेलवाडी, ता. इंदापूर) असे चार अपत्यांना जन्म दिलेल्या मातेचे नाव आहे. 
      दरम्यान बारामती शहरातील स्त्रीरोगतज्ञ डॉ.जे.जे. शहा यांच्या जिवराज हॉस्पिटलमध्ये स्वाती यांना सोमवारी (दि. १३) रात्री दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर त्यांच्या रक्तामध्ये युरिक अँसिचे प्रमाण वाढण्यासह इतर शारिरीक बाबी वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्या.

(* साभार - पुण्यनगरी)
 
Top