मुंबई -: महाराष्ट्र शासनाच्या कार्यनियमावलीत आणखी सुधारणा करण्यासाठी ‘महाराष्ट्र शासन कार्यनियमावली (सुधारणा) नियम, 2013’ अंमलात आला आहे.
      महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या पहिल्या अनुसूचीमध्ये नोंद क्रमांक 29- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामधील उप शीर्ष क्रमांक -दोन- सांस्कृतिक कार्य विभागमधील अनुक्रमांक (36) वाङ् मय पुरस्कार वगळण्‍यात आला आहे. नोंद क्रमांक 31, ‘मराठी भाषा विभाग’ मधील अनुक्रमांक (5) नंतर ‘उत्कृष्ट मराठी वाङ् मय पुरस्कार योजना, श्री. पु. भागवत पुरस्कार योजना, विंदा करंदीकर पुरस्कार योजना, मराठी भाषेशी संबंधित इतर बाबी’. या नोंदी समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
      याबाबतची अधिसूचना 22 मार्च 2013 रोजी सामान्य प्रशासन विभागाने महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग चार-अ, मध्ये प्रसिध्द केली आहे.
 
Top