उस्मानाबाद :- रब्बी हंगामातील 293 गावे जिल्हा प्रशासनाने टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. त्यात उस्मानाबाद तालुक्यातील 69 गावे, तुळजापूर तालुक्यातील 6 गावे, भूम तालुक्यातील 90 गावे, वाशी तालुक्यातील 12 गावे आणि परंडा तालुक्यातील 96 गावाची पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी जाहीर झाल्याने ही गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर केली आहेत.
टंचाई परिस्थिती जाहीर झालेल्या गावातील इयत्ता 10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफीचे प्रस्ताव विहीत नमुन्यात दि. 20 मे पर्यंत शिक्षण विभाग (मा.) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या कार्यालयात समक्ष सादर करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी व्ही.के. खांडके यांनी केले आहे.
जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक शाळेतील इयत्ता 10 वी व 12 वी मधील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव विहीत प्रपत्रात अनुक्रमांक, विद्यार्थ्याचे नाव, इयत्ता, जातीचा प्रवर्ग, टंचाईग्रस्त भागातील गावाच्या यादीतील अनुक्रमांक, परीक्षा शुल्कपरिपुर्ती रक्कम आणि शेरा नमूद करावा. तसेच या प्रस्तावामध्ये एस.सी. एस.टी, एस.बी.सी आणि व्ही .जे. एन. टी. प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थींनीचा समावेश करु नये, असेही म्हटले आहे.