सोलापूर -: जिल्हा नियोजन समितीचा सन 2013-14 चा 238 कोटी 68 लाख रुपयांचा मुळ आराखडा मंजुर करण्यात आला होता. राज्यस्तरीय बैठकीत तो वाढवून 250 कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देण्यात आली. तसेच सन 2012-13 च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशिय सभागृहात आज दि. 11 मे रोजी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी व्यासपिठावर महापौर अलका राठोड, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, महापालिका आयुक्त अजय सावरीकर, अधिक्षक अभियंता श्री. दाभाडे उपस्थित होते.
सन 2013-14 च्या आराखडयामध्ये 25 टक्के निधी लघुपाटबंधारे व जलसंधारण कामांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. पंजाबराव देशमुख योजनेकरीता 8 कोटी, उजनी जलाशय विशेष नळ दुरुस्ती योजनेकरीता 3 कोटी 65 लाख, नाविण्यपुर्ण योजनेअंतर्गत विविध उपक्रम, गाळ काढण्यासाठी जेसीबी मशिन खरेदीकरीता 3 कोटी रुपये, त्याला लागणा-या डिझेलकरीता 3 कोटी रुपये, कोल्हापुरी बंधा-यांच्या दुरुस्तीकरीता 3.50 कोटी रुपये आणि इतर जिल्हा योजनांकरीता 2 कोटी 50 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. सन 2012-13 मध्ये जिल्हयास 245 कोटींचे नियतव्यय प्राप्त झाले होते. त्यापैकी 241 कोटी 70 लाख रुपये खर्च झाले असून 99.99 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच यावेळी अनुसूचित जाती उपयोजना आणि आदीवासी उपाययोजना यांचाही आढावा घेण्यात आला.
बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रा. ढोबळे म्हणाले की, पाणी स्त्रोतांच्या ठिकाणी टँकर लवकर भरुन टँकरच्या फे-या योग्य रितीने होण्याकरीता जिल्हयात 1946 स्त्रोत असून ही संख्या वाढविण्याची गरज आहे. इंदिरा आवास योजनेत जिल्हयाचे काम उत्कृष्ठ झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्हयात शिरपुर पॅटर्न अंतर्गत सुरु असलेल्या सिमेंट नाला बांधांचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरण काटेकोर होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असून राष्ट्रीय पेयजल योजना आणि निर्मलग्राम योजनेला गती देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जिल्हयातील सांगोला व मंगळवेढा तालुक्यात यांत्रिकी विभागाच्या वतीने गाळ काढण्यास गती आली आहे. जिल्हयात आणखी एक यांत्रिक विभागाचे युनिट येण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
तसेच उजनी जलाशयातून चौथे अवर्तन 4.50 टिएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. ते वाढवून 5 टिएमसीपेक्षा अधिकचे पाणी देण्यात यावे. यासाठी पाटबंधारे विभागाकडे मागणी करण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस सर्व आमदार गणपतराव देशमुख, बबन शिंदे, विजयकुमार देशमुख, दिलीप माने, भारत भालके, प्रणिती शिंदे, सिद्रामप्पा पाटील, हणुमंत डोळस, समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे, महिला व बालकल्याण सभापती जयमाला गायकवाड यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य व अधिकारी उपस्थित होते.