उस्मानाबाद :– राज्य दुष्काळमुक्त करण्याची सरकारने प्रतिज्ञा घेतली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले. उस्मानाबाद शहरासाठीच्या महत्वाकांक्षी उजनी पाणी योजनेचे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. या निमित्ताने येथील नगर परिषदेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते.
या कार्यक्रमाला उस्मानाबादचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, खासदार डाँ. पद्मसिंह पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील, विक्रम काळे, राहूल मोटे तसेच उस्मानाबद जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष व्हट्टे, उस्मानाबादच्या नगराध्यक्षा सौ. सरस्वती घोणे, जिल्हाधिकारी डाँ. के. एम. नागरगोजे, मुख्याधिकारी अजय चारठाणकर आदींची उपस्थिती होती.
उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कार्यान्वित करण्यात आलेल्या 114 किलोमीटर्स लांबीच्या पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री चव्हाण व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते तेरणा जलशुद्धीकरण प्रकल्प येथे कोनशिलेचे अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषदेच्या प्रांगणात जाहीर समारंभ झाला. उस्मानाबाद शहराच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठ्यासाठी आता शाश्वत असा स्त्रोत उपलब्ध झाला आहे. त्यामुळे टँकरवरचा खर्च वाचणार आहे. ही योजना सुरळीत चालावी यासाठी आवश्यक असलेल्या अखंडीत वीज पुरवठ्यासाठीच्या एक्स्प्रेस फिडर्सचाही खर्च शासन करणार आहे. शहराच्या विस्तारित भागासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. सौर उर्जेबाबत राज्यभरातच धोरण आखले जाईल, त्यामध्येही उस्मानाबादचा प्राधान्याने विचार केला जाईल. पण एकंदरच पिण्याच्या पाण्याचा वापर जपून करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे मीटरद्वारे पाणी देण्यासाठी या शहरानेही विचार करावा.
मुख्यमंत्री ना. चव्हाण म्हणाले, महसुल कायद्याप्रमाणे दुष्काळाचे निकषच वेगळे आहेत. दुष्काळाशी निगडीत पैसेवारीचे निकष हे शेतीच्या उत्पन्नावर आधारीत आहेत. हे निकष पिण्याचे पाणी, जनावरांसाठीचे पाणी-चारा यांच्या उपलब्धतेवर आधारीत असावेत असे बदल करावे लागतील. राहणीमानातही प्रचंड बदल होतो आहे. नागरीकरण वाढते आहे. शहरांकडे ओघ वाढला आहे. त्यामुळेही पाण्याचा दरडोई वापर वाढतोच आहे. राज्याच्या सातारा आणि पुण्यासारख्या जिल्ह्यातही निसर्गाच्या असमतोलामुळे टंचाईची परिस्थिती ओढवते. त्यामुळेच आता असेल ते पाणी वाचवणे आणि विकेंद्रीत साठा करणे यावर भर द्यावा लागेल.
यावेळी राज्यातील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतानाच मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्याबाबत सरकारने केलेल्या अनेक उपाययोजनांची माहिती दिली. त्यामध्ये दिडशे कोटींच्या तरतूदीद्वारे राज्यात 1497 सिमेंटचे बंधारे बांधणे, तसेच शेततळ्यांचे अस्तरीकरण, बंधारे-धरणातील गाळ काढण्याची मोहिम, शहरातील तलावांचे पुनरुज्जीवन, कोल्हापूरी बंधाऱ्यांबाबतचे पुनर्नियोजन, 1972दरम्यान घेण्यात आलेल्या पाझर तलावांचे केंद्राच्या ट्रीपल-आर योजनेतून पुनरूज्जीवन अशा बाबींचा त्यांनी उल्लेख केला.
ना. चव्हाण म्हणाले, पाण्याचा वापर यापुढे काळजीपुर्वकच करावा लागेल. त्यासाठी मीटरने पाणी पाणी पुरवठ्याची योजना राज्यभरात राबवावी लागेल. ऊसासारख्या पिकासाठी यापुढे ठिबकच्या वापराचाच आग्रह धरावा लागेल. टंचाईचा सामना करण्यासाठी राज्य सरकार पुर्ण प्रय़त्न करते आहे. त्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येताहेत. त्याला जनतेच्या प्रतिसादाचीही अपेक्षा आहे. यातूनच राज्य पुर्ण दुष्काळमुक्त करण्याची सरकारने प्रतिज्ञा घेतली आहे.
यावेळी अध्यक्षीय भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, उस्मानाबादच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवून असे आम्ही सांगितले होते. उजनी पाणीपुरवठा योजनेमुळे हे काम पुर्ण झाले आहे. उस्मानाबादकरांनीही आता पाणी वापराबाबत काळजी घ्यावी. वितरण व्यवस्ता सुधारावी. शहराच्या जवळपासच्या धरणांमधील योजनांही आम्ही मार्गी लावल्या. मात्र अनेक ठिकाणी अडचणी जाणवतात, त्या सबंधित पातळीवर मार्गी लावल्या गेल्या पाहिजेत. दुष्काळाचे मोठे संकट मराठवाड्यातील चार जिल्हे तसेत राज्याच्या काही भागातही आहे. शासनाने संपुर्ण ताकद या भागाच्या मदतीसाठी लावली आहे. आतापर्यंत धरणातील गाळ काढण्याच्या मोहिमेमुळे पाणीसाठा मदत होणार आहे. मात्र योजनांचा लाभ घेताना शिस्त आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री मधुकरराव चव्हाण म्हणाले, हा क्षण उस्मानाबादच्या नागरिकांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहीण्यासारखा आहे. रेंगाळलेल्या या योजनेसाठी मुख्यमंत्र्यांनी 51 कोटी उपलब्ध करून दिले. त्याला उपमुख्यमंत्री पवार यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे ही योजना पुर्णत्त्वास येऊ शकली.
आमदार राणाजगजिंतसिंह पाटील यांनी प्रास्ताविकात या योजनेसाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती दिली. अनेक अडचणीतून शासनाच्या सहकार्यामुळे ही योजना पुर्ण झाल्याचे ते म्हणाले.
प्रभारी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी स्वागत केले. ते म्हणाले, समुद्रसपाटीपासून एक हजार फुट उंचीवरील ही वैशिष्ट्यपुर्ण योजना आहे. यासाठी शासनाने भरपूर मदत केले. निधीची कमतरता भासू दिली नाही. उस्मानाबादच्या जनतेच्यावतीने ऋण व्यक्त करतो.
यावेळी उस्मानाबाद नगरपरिषदेच्यावतीने मुख्यमंत्री चव्हाण यांना मानपत्र देण्यात आले. तसेच उजनी योजना पुर्ण झाल्याबद्दल शहर नागरी समितीच्यावतीनेही मुख्यमंत्र्यासह, उपमुख्यमंत्री व प्रमुख मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
तत्पुर्वी मुख्यमंत्री चव्हाण, उपमुख्यमंत्री पवार यांनी खानापूर येथील हातलादेवी मंदिराच्या पायथ्याशी असणा-या या पाणी पुरवठा योजनेतील बुस्टरची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे विविध शिष्टमंडळांची निवेदने स्विकारली.