बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : पर्यावरणाच्या -हासाने संपूर्ण विश्वातील मानवाचे जीवनमान बदलले असून वेश्विक बदलावर उपाय म्हणून पर्यावरणाचे संतुलन राखणे गरजेचे असल्याने अनेक संस्था व समाजसेवकांनी पर्यावरणाच्या बाबत जनजागरण सुरु केले आहे.
बार्शीतील पर्यावरणप्रेमी देशमाने यांनी मे महिन्यातील त्यांना होणा-या उत्पन्नातून 25 टक्के रक्कम रवि पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून तळयातील गाळ काढणे व शहरातील फॉरेस्टमध्ये लागवड केलेल्या वड, पिंपळाच्या झाडांना टाकण्यात येईल. सदरच्या कामात आणखी जादा खर्च येणार असल्याने स्वेच्देन कोणी देणगी दिल्यास गोळा करण्यात येणार आहे. ही राष्ट्रसेवा असून त्यासाठी ज्यांच्याकडे धन नसेल त्यांनी श्रमदान करावे, घरातील जुने पाण्याचे माठ असल्यास तेही दिल्यास त्याचा वापर झाडांच्या ठिबक सिंचनासाठी करण्यात बार्शीतील रवि क्लासेसचे संस्थापक मधुकर डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरु केले आहे. हनुमन जयंतीच्या मुहुर्तावर नुकत्यास कापडी 500 पिशव्यांचे वाटप करुन त्यांनी प्लास्टीकच्या पिशव्या वापरु नका व पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश दिला आहे.
यावेळी क्रिडात्तेजक मंडळाचे उपाध्यक्ष मधुशेठ चांडक, रावसाहेब यादव, अतूल झ्टकर, मिलींद देशमाने, मनोहर जोशी, महेश जोशी, अमोल इटकर, राजा पवार, कुमार कांबळे आदीजण उपस्थित होते.
यावेळी क्रिडात्तेजक मंडळाचे उपाध्यक्ष मधुशेठ चांडक, रावसाहेब यादव, अतूल झ्टकर, मिलींद देशमाने, मनोहर जोशी, महेश जोशी, अमोल इटकर, राजा पवार, कुमार कांबळे आदीजण उपस्थित होते.