मुरुम -: मुरुम (ता. उमरगा) येथील बसस्थानकातून पश्चिम महाराष्ट्रातील भोर व मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद अशी बससेवा सुरू केल्यामुळे प्रवाशी व नागरिकांतून एसटी महामंडळाचे अभिनंदन केले जात आहे.
मुरुम येथून सकाळी 7 वाजता औरंगाबादला बस सुटते. ती नळदुर्ग, तुळजापूर, उस्मानाबाद, बीडमार्गे ही बस दुपारी 3 च्या सुमारास औरंगाबाद येथील सिडको बसस्थानकावर पोहोचते. सकाळी 10 वाजता औरंगाबाद येथून निघून रात्री 8 वाजता मुरुम बसस्थानकात येईल. त्याचप्रमाणे सकाळी 8 वाजता भोर येथून बस सोडण्यात येत आहे. सोलापूर, इंदापूर, बारामती, जेजुरी, नारायणपूर या मार्गे ही बस भोर येथे जाईल. दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजता याच मार्गे बस परत येणार असल्याची माहिती वाहतूक निरीक्षक अर्जुन भालकाटे यांनी दिली. या दोन्ही बसचा शुभारंभ पेढे वाटून करण्यात आला. यावेळी नगरसेवक गुरुनाथ टिकांबरे, काशिनाथ टिकांबरे, बंडू बदोले, गोपाळ इंगोले, पंडित संगुळगे, डॉ. नितीन डांगे, प्रा. दत्ता इंगळे, तौफीक कादरी आदीजण उपस्थित होते.