बार्शी :- किरकोळ कारणाचा राग मनात धरुन डोळयात चटणी टाकून लोखंडी गंज, तलवार व चैनीच्या साखळीने झालेल्या मारहाणीत 8 जण गंभीर जखमी झाल्याची घटना बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे शनिवार दि. 4 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या घडली. या मारहाणीत हॉटेल साहित्य व एका महिलेच्या अंगावरील सोने असे मिळून सुमारे 80 हजाराचे नुकसान झाले आहे.
सुधाकर वाघमोडे, बबन माळी, श्रीकृष्ण वाघमोडे, मोहन वाघमोडे, अमोल वाघमोडे, हनुमंत वाघमोडे, परमेश्वर वाघमोडे, मंजुळा वाघमोडे असे मारहाणीत जखमी झालेल्यांचे नावे आहेत. सदरच्या प्रकारातील आरोपी प्रशांत खुने, बाळासाहेब खुने, शशिकांत खुने, सुरज खुने, विलास खुने, अमोल खुने, गुरुनाथ उघडे, नामदेव उघडे यांनी संगनमताने वरील आठ जणांना जबर मारहाण करत हॉटेलमधील साहित्यांचे मोठयाप्रमाणात नुकसान केले आहे. सुधाकर रावसाहे वाघमोडे यांनी सदरच्या घटनेची वैराग पोलिसात फिर्याद दिली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सदाशिव गिडडे हे करीत आहेत.