बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: के.टी. ट्रॅक्टर्स, बार्शी व कुबोटा अँग्रीकल्चर (इं.) प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने कुबोटा एल 4508 (मार्क 2) या ऑलराऊंडर ट्रॅक्टरचा अनावरण सोहळा तसेच शेतकरी मेळावा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाना कसपटे तर प्रमुख पाहुणे म्हणून रिजनल सेल्स मॅनेजर आशुतोष देशमुख, एरिया सेल्स मॅनेजर आदिनाथ गवंडी, सर्व्हिस मॅनेजर विजय, के.टी. ट्रॅक्टरचे भागीदार संतोष ठोंबरे, प्रविण कसपटे, रविंद्र कसपटे आदीजण उपस्थित होते.
कुबोटा एल 4508 (मार्क 2) हा ट्रॅक्टर 45 एच.पी. असून फोर व्हील ड्राईव्ड, शटर गियर इत्यादी अनोख्या सुविधा यात असून छोट्या ट्रॅक्टर बी. 2420 प्रमाणेच प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा असल्याचे कसपटे यांनी म्हटले. जिल्ह्यातील विविध भागातील आलेल्या शेतकरी वर्गाची संख्या लक्षणीय होती. त्यांच्यासाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला. यात कन्हेरगावचे दत्तात्रय आगलावे, जागजीचे बब्रुवान मगर, म्हैसगावचे गोपीचंद पाटील यांना बक्षीसे मिळाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष ठोंबरे यांनी तर सुत्रसंचालन जनरल मॅनेजर गणेश शिंदे केले.