बार्शी -: येथील महाद्वार चौक येथे अज्ञात जमावाकडून झालेल्‍या मारहाणीत शहाजी शंकर साळुंके (वय 23, रा. पाटील प्‍लॉट) या युवकाच्‍या डोक्‍याच्‍या मागील बाजूस गंभीर दुखापत झाल्‍याने त्‍याला जगदाळे मामा रुग्‍णालया दाखल करण्‍यात आले.
    तपासणीनंतर डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानुसार त्‍याला अतिदक्षता विभागात दाखल करण्‍यात आले आहे. सदरची घटना पाहून प्रत्‍यक्षदशभ्‍्रने बार्शी पोलिसांना सदरच्‍या प्रकराची हकीकत कळविली. काही वेळानंतर बार्शी पोलिसांचे एक पथक घटनास्‍थही आले. त्‍यावेळीही सदरच्‍या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. जखमीला उपचाराची गरज असल्‍याने त्‍याला तातडीने रूग्‍णालयात हलविण्‍यात आले. सदरच्‍या घटनेची माहिती सांगण्‍याच्‍या अवस्‍थेत जखमी नसल्‍याने त्‍याचा जबाब नोंद करण्‍यात आला नाही. भांडणाचे नेमके कारण समजू शकले नाही. घटनेनंतर झालेल्‍या तणावाच्‍या वातावरणामुळे आजूबाजूच्‍या छोट्या व्‍यावसायिकांनी आपली दुकाने काही काळ बंद ठेवली होती.
 
Top