भूम :- सध्या सर्वत्र पाणी प्रश्नाने हाहाकार उडविले असून पाण्यासाठी ग्रामस्थांना दाहीदिशा वणवण भटकावे लागत आहे. काहींना घोटभर पाण्यासाठी आपले प्राण गमवावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तर तलावे आटले, मात्र वरील सर्व घटनेला छेद देत नळीवडगाव, अंतरवली (ता. भूम) या गावाच्या सिमेवर असणा-या तिंत्रज पाझर तलावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वीस फूट खोलीचा 40 बाय 30 चा खड्डा खणला असून त्यास भरपूर पाणी लागले आहे. ऐन उन्हाळ्यात खणलेल्या खडयात पाणी अवतरल्याने पिण्याचे पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नळीवडगावच्या सरपंच द्रोपदी जनार्धन पाटील यांनी त्यांच्या स्वतःचे इंजिन पाणी काढण्यासाठी दिले आहे. त्याचा वापर या ठिकाणी केला जात आहे. मुंबईच्या सर जमशेदजी टाटा ट्रस्ट, पर्याय संस्था कळंब व नळीवडगाव, अंतरवली या गावातील ग्रामस्थ, महिला बचत गटाच्या सदस्या यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी टंचाई निवारणाचे कार्य करण्यात येत आहे. तसेच जनावरांसाठी देखील एक स्वतंत्र चर येथे खणला आहे. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. नळीवडगाव व अंतरवली या ठिकाणी जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी तीन हौद ठेवण्यात आले आहे. परिसरातील नळी, अंतरवली, नळीवडगाव, घूलेवाडी आदी गावामध्ये येथील पाणी टँकरद्वारे भरुन नेले जात आहे. सदरच्या कामामुळे परिसरातील शेतक-यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. यासाठी रामदास पाटील, युवराज आहेर, चांगदेव आहेर, पोलीस पाटील परमेश्वर भोजने, अनंत कोकडे, जयराम डोके, सचिन गव्हाणे यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या परिश्रम घेत आहेत. सदर ठिकाणी गटविकास अधिकारी एस.एस. मुल्ला यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. याकामी पर्याय संस्थेचे समन्वयक विलास गोडगे, हर्षल शिंदे, सिंधू भालेराव, भिकाजी जाधव, प्रमिला पांचाळ या कार्यरत आहेत.