कळंब -: मी, माझा नवरा आणि माझी मुले या पलीकडे कुटूंबच नसल्याने, सुशिक्षित घरामध्ये अशिक्षित सदस्यांचे विचार पटत नसल्याने एकत्र कुटुंबाची चर्चा ही होत नसल्याने एका सर्वेक्षणामध्ये आढळून आले आहे.
    माय, आई नंतर आता मम्मी असे शब्द प्रचलित झाले. बदलत्या काळाप्रमाणे नात्याच्या ही ओळखी पुसत गेल्या. नातवाला मांडीवर घेऊन चिऊ काऊ च्या गोष्टी सांगणारे आजी आजोबा हे आता प्लॉटच्या घरातून नाहीशे झाले आहेत. आजी आजोबाची जागा आता टी.व्ही. ने घेतल्याने नातवांनाही आता कुणाची आठवण येत नाही.
    सहारा संस्थेने एकत्र कुटुंब या सर्वेक्षणामध्ये पाच टक्केच्या ही कमी प्रमाणात एकत्र कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत आहे. ग्रामीण भागात त्याला मोठे खटले, असे संबोधले जाते. खटल्यातील सुन करा म्हणजे सांभाळून घेईल, असे जुनी मंडळी सल्ला देतात. सुशिक्षित आई घर पुढे नेई, असे म्हटले जात असले तरी आडाणी आई आणि घरपुढे नेई ही म्हणणे योग्य असून त्याचा प्रत्यय प्रत्येक घरात दिसून येतो.
    या सर्वेक्षणामध्ये घरामध्ये शिकलेल्या मुलींचे आणि आडाणी सासूचे जमत नसल्याने वेगळे राहावे लागते, असे चाळीस कुटुंबियाचे म्हणणे आहे. तर नोकरीच्या निमित्ताने आम्ही बाहेरगावी असल्याने आई-वडिलासोबत राहता येत नसलयाचे तीस टक्के कुटुंबाचे म्हणणे आहे. तसेच घरातील सर्वच सदस्‍य अशिक्षित आहेत. याचा परिणाम मुलावर होऊ नये, म्‍हणून आम्‍ही वेगळे राहत राहत असल्‍याचे दहा टक्‍के कुटुंबाचे म्‍हणणे आहे. तर घरची परिस्थिती बिकट आहे, सदस्‍य संख्‍या ही मोठी आहे. सासुरवाडीचे टेकण आहे. मग त्‍यांचेच ऐकावे लागते. त्‍यामुळे आम्‍हाला वेगळे राहावे लागते, असे दहा टक्‍के कुटुंब सांगतात. तर बायको बरोबर जमत नाही, उगीच किटकिट नको म्‍हणून आई-वडीलांना वृध्‍दाश्रमात पाठवले आहे. आम्‍ही आठवड्यातून एकदा जावून काळजी घेतो, असे पाच टक्‍के कुटुंबाचे म्‍हणणे आहे. एकंदर जमत नाही, या शब्‍दामुळे रक्‍ताच्‍या नात्‍यात अंतर पडल्‍याने एकत्र कुटुंबाची वाताहात झाली आहे.
    या संदर्भात काही वयोवृध्‍दाबरोबरच ही चर्चा झाली. त्‍यांचा कुणावरही राग नाही. मुले-सुना चांगल्‍या असून ते नशिबाला दोष देतात. मी देवळात झोपतो, म्‍हातारी लेकीकडेच असते, असे ही मंडळी सांगतात. तर अनेकजण एकत्र कुटुंबाची मजा लुटतात. चुलते, भाऊ, बहिणी, नातवंडे, पतवंडे असा मोठा लवाजमा आणि एकाच चुलीवर केलेल्‍या भाकरी, सगळ्या समवेत खाण्‍याची मौजमजा वेगळीच असते.
    नौकरदार असणा-या किंवा जास्‍त शिक्षण घेतलेल्‍या मुला-मुलीमध्‍ये एकत्र राहण्‍याचा कल दिसून येत नाही. त्‍यामुळे ओळख ही विसरुन जावू लागल्‍या आहेत. आज कुटुंब दिवस आहे निदान आज तरी कवितीच मी पणा, मतभेद सोडून एकत्र येण्‍याची आहे. पूर्वीच्‍या काळी असणारे खटले आता इतिहास जमा झाली आहेत.
साभार : दै. एकमत
 
Top