नळदुर्ग -:  अणदूर (ता. तुळजापूर) येथे महात्‍मा बसवेश्‍वर जयंतीनिमित्‍त उत्‍सव समितीच्‍यावतीने विविध कार्यक्रम संपन्‍न झाले. बुधवार दि. 15 मे रोजी पशुधन स्‍पर्धा घेण्‍यात आल्‍या. यावेळी जिल्‍हा बँकचे संचालक सुनीलराव चव्‍हाण, अँड. दिपक आलुरे, पंचायत समिती सदस्‍य साहेबराव घुगे, बाळकृष्‍ण घोडके, तालुका पशुधन अधिकारी परंडाकर हे उपस्थित होते.
    यावेळी बोलताना अँड. दिपक आलुरे म्‍हणाले की, दुष्‍काळी स्थिती असताना पशुधन बचाव करण्‍याची गरज आहे. मात्र पशुधनाची स्‍पर्धा कमी होतात, त्‍यासाठी हा उपक्रम मोठा होण्‍याची गरज आहे. यावेळी स्‍पर्धेसाठी परीक्षक म्‍हणून डॉ. परंडाकर, ताकमोघे, कांबळे यांनी काम पाहिजे. या स्‍पर्धेत खिल्‍लार मध्‍ये सुशांत आलुरे, परमेश्‍वर गोवे तर खोड खिल्‍लारे अनुक्रमे विजयी झाले. अच्‍युत आलुरे तर विक्रम कुताडे, मच्छिंद्र सुरवसे, हेही अनुक्रमे विजयी झाले. गायरान बैलजोडीमध्‍ये दिपक घुगे, सुरवसे यांना प्रथम बक्षीस विभागून देण्‍यात आले. यावेळी उत्‍सव समितीचे आप्‍पासाहेब शेटे, किरणे मुळे, अच्‍युत आलुरे, आकाश लंगडे, बाबुराव मुळे, श्रीशैल मुळे, गुरुनाथ मिटकर, उमाकांत आलुरे यांनी परिश्रम घेतले.
 
Top