नवी दिल्‍ली : स्‍पॉट फिक्सिंगप्रकरणात आणखी काही क्रिकेटपटू अडकण्‍याची शक्‍यता आहे. श्रीसंतने पोलिस चौकशीमध्‍ये काही खेळाडुंची नावे उघड केली असून हे खेळाडू आयपीएलच्‍या दोन संघाकडून खेळतात. त्‍यात एका विदेशी खेळाडूचा समावेश आहे.
     स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक झाल्‍यानंतर श्रीसंत तोंड उघडण्‍यास तयार नव्‍हता. त्‍याला बोलते करण्‍यासाठी पोलिसांनी भा‍वनिक मार्गांचा अवलंब केला. अखेर तो बोलता झाला. श्रीसंतने आयपीएलच्‍या दोन इतर संघाच्‍या 4 खेळाडुंची नावे घेतली. या खेळाडुंचे फिक्सिंगशी तार जोडण्‍यात पोलिसांना ब-यापैकी यश आले आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविरुद्ध पुरावेही गोळा करण्‍यात आले आहेत. त्‍यामुळे लवकरच त्‍यांना अटक होऊ शकते.

 
Top