कळंब (भिकाजी जाधव) -: भरधाव बस व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण ठार झाले. मयत हे कुंथलगिरी येथून दर्शन घेऊन कारने परतत असताना येरमाळ्याजवळ शुक्रवार रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास काळाने त्यांच्यावर झडप घातली.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सुरेश हिराचंद शहा (वय 60), महेश सुरेश शहा (वय 35), रेखा सुरेश शहा (वय 55), मिहिका महेश शहा (वय 30), मेघावी महेश शहा (वय 8) (सर्व रा. सोलापूर, हल्ली मुक्काम पुणे) असे अपघातात मरण पावलेल्यांचे नावे आहेत. स्विफ्ट कार क्रमांक एम.एच. 12 एफ.पी. 2812 यामध्ये शहा कुटुंबीय शुक्रवार रोजी कुंथलगिरी येथे दर्शन घेऊन लातूरकडे निघाले असता हुमनाबादहून औरंगाबादकडे कर्नाटक राज्याची बस क्रमांक के.ए. 38 एफ. 633 ही भरधाव वेगाने येऊन बस व कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये स्विफ्ट मधील एकाच कुटूंबातील सुरेश शहा, महेश शहा, रेखा शहा, मिहिका शहा हे चौघे जागीच ठार झाले तर ८ वर्षाची मुलगी मेघावी शहा ही उस्मानाबादच्या रूग्णालयात मरण पावली.
शहा कुटूंब सोलापूर येथील रहिवाशी असून सध्या ते पुणे येथे राहतात. देवदर्शन आटोपून हे कुटूंब महेश यांच्या लातूर येथील बहिणीच्या भेटीसाठी चालले होते. भीषण अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानाबादच्या रूग्णालयात पाठविण्यात आले आहे. हा अपघात अतिशय भयंकर होता.

या भीषण अपघातातील मयत व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी येरमाळा येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मदत केली. गाडीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी तंटामु्क्ती अध्यक्ष महावीर अचरेकर, सुहास चालक, नागेश बिडवे, हर्षल बारसकर, विकास बारकुल, शिवसेना नेते अनिल पवार, गणेश बारकुल, रणजित बारकुल, संजय मोहिते आदींनी मदत केली. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोताळे, पंजाबराव भगत, नेताजी बंडगर, राकेश पवार, रोडगे बापू यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. इतका भीषण अपघात घडल्यानंतरही नेहमीप्रमाणेच प्राथमिक आरोग्य केंद्राची रूग्णवाहिका घटनास्थळी उशीराने पोहचली. जर ही रूग्णवाहिका वेळेवर आली असती तर त्या आठ वर्षीय चिमुकलीचा प्राण वाचला असते, अशी चर्चा उपस्थितात होती.