सुयश मुंढे
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील सुयश उमेश मुंढे याने पूर्व माध्‍यमिक शिष्‍यवृत्‍ती परीक्षेत सुयश मिळवून सोलापूर जिल्‍ह्यात प्रथम येण्‍याचा बहुमान मिळविला.
    नवीन मराठी शाळेत त्‍याचे सुरु असून 300 पैकी 292 गुण मिळवत राज्‍यात चौथा तर जिल्‍ह्यात प्रथम आला आहे. यापूर्वी तिसरीत झालेल्‍या एम.टी.एस. परीक्षेतही केंद्रात प्रथम व राज्‍यात द्वितीय क्रमांकाचे यश मिळविले होते. आय.पी.एम. परीक्षेत 130 व्‍या गुणांकन मिळवले होते. त्‍या मिळालेल्‍या यशानंतर वर्गशिक्षक नागटिळक, मुख्‍याध्‍यापक रामहरी गाडे, लष्‍कर, बनसोडे आदी अभिनंदन केले आहे.
 
Top