नळदुर्ग -: किलज (ता. तुळजापूर) येथे पाण्याच्या टँकरखाली चिरडून मरण पावलेल्या मयताच्या कुटुंबास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी रिपब्लिकशन पार्टी ऑफ इंडिया तुळजापूर तालुक्याच्यावतीने निवदेनाद्वारे करण्यात आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील किलज येथे सध्या पाणी टंचाई असल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून दि. 11 मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावातील रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडाच्या बुडावर उभा राहून टँकरची वाट पाहत येथील राम ऊर्फ नितीन सोनाजी गवळी (वय 15 वर्षे) हा उभा होता. यावेळी पाण्याचा टँकर गावात प्रवेश करताना टँकर चालकाने बेजबाबदारपणे टँकर चालविल्याने सदर पाण्याचा टँकर हा रस्त्याच्या कडेला पडलेल्या लाकडाच्या बुडाला धडकला असता त्यावर उभा असलेला नितीन गवळी हा टँकरच्या मागील चाकाखाली पडला. अंगावरुन टँकरचा चाक गेल्याने टँकरखाली चिरडून तो जागीच मरण पावला. मयत नितीन गवळी याच्या कुटुंबाला केवळ सांत्वन, भेट न देता मयताच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधी व शासनाच्या अन्य योजनेतून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी रिपाइंच्यावतीने करण्यात आली आहे. संबंधित टँकरचालक मालक व शासकीय कर्मचारी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, तालुकाध्यक्ष एस.के. गायकवाड, सुशांत, क्षिरसागर, पांडागळे भास्कर, श्रावण वाघमारे आदींच्या सह्या आहेत.