नाझरा :- चोपडी ता.सांगोला येथील वाड्यावस्यावर असणार्‍या लोकांची पाण्यासाठी बर्‍याच वेळा दुरवर पायपीट करावी लागते, अशा बिकट स्थितीचा विचार करून पुणे येथील थिसेनक्रप इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लि.या कंपनीच्यावतीने चोपडीतील वाड्यावस्त्यांवर असणार्‍या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असल्याने चोपडी ग्रामस्थांकडुन याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे.
       पाणीवाटपाच्या शुभारंम प्रसंगी सरपंच जालिंदर बाबर,उपसरपंच ज्ञानेश्वर बाबर, ग्रामपंचायत सदस्य जालिंबर कृष्णा बाबर, संतोष डोंगरे, दगडु बाबर, यशवंत बाबर, के.एस.बाबर, रामचंद्र केंगार, सुरेश बाबर, दिलीप बाबर, सुनिल पवार, राजेंद्र गायकवाड, पोपट बाबर, दत्तात्रय खळगे, विजय बाबर, अभिजीत बाबर, कृषी सहाय्यक हणमंत बाबर आदी उपस्थित होते.यावेळी थिसेनक्रप इंडस्ट्रीज इंडिया प्रा.लि.या कंपनीचे वरिष्ट अभियंता कृष्णा अशोक बाबर यांनी आपल्या मनोगतातुन सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन कंपनीने अशाप्रकारचा स्तृत्य उपक्रम हाती घेतला आहे. चोपडी ग्रामपंचायतीच्यावतीने कंपनीचे आभार मानले जात आहे.

(* सौजन्‍य : सांगोला न्‍यूज लाईव्‍ह)
 
Top