![]() |
अनिल वळीव |
सोलापूर -: सोलापूर-विजापूर महामार्गावरील नांदणी येथे झालेल्या संगणकीकृत आंतरराज्य सीमा तपासणी नाक्यामुळे आरटीओ, विक्री कर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क या तिन्ही विभागाचे काम एकत्रितरित्या होणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव यांनी सांगितले. नांदणी येथे उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून बीओटी तत्वावर संगणीकृत आंतरराज्य सीमा तपासणी नाका उभारण्यात आला आहे. या नाक्याचे उदघाटन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शनिवार दि. 18 मे रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वळीव यांनी माहिती दिली.
राज्यात शासनाच्यावतीने ठाणे, सोलापूर आणि धुळे या ठिकाणी असलेले आंतरराज्य सीमा तपासणी नाके हे अत्याधुनिक संगणकीकृत करण्यात येत आहेत. ठाणे येथील सीमा तपासणी नाक्याचे काम पूर्ण होऊन त्याचे उदघाटन करण्यात आले असून आता सोलापूरच्या तपासणी नाक्याच उदघाटन होत आहे.
हा तपासणी नाका अद्ययावत करण्यासाठी 80 ते 100 कोटी रुपये इतका निधी लागला असून तो संभाव या कंपनीकडून संगणकीकृत करण्यात आला आहे. हा नाका संगणकीकृत असून रांगेमध्ये वजन काटे, ओव्हरलोड तपासणी यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमे-याचे मुंबईतील नियंत्रण कक्षात थेट प्रक्षेपण, आरएफआयडी टॅगची व्यवस्था अशा अत्याधुनिक बाबी या ठिकाणी पुरविण्यात आल्या आहेत. या तपासणी नाक्यामध्ये पेट्रोल पंप, पिण्याच्या पाण्याची सोय, राहण्याची सोय, वाहनचालकांसाठी कॅन्टीन आदी सोयीदेखील पुरविण्यात आल्या आहेत. वाहनांमधील ओव्हरलोड तपासण्याची यंत्रणा या ठिकाणी आहे. ओव्हरलोडच्या कारवाईमध्ये वाढ होण्याची शक्यता असून त्यामुळे वाहनांमध्ये शिस्त लागले. या तपासणी नाक्यावर विक्री कर विभाग यांचेदखील अधिकारी असणार आहेत. आरटीओरचा महसूल जरी कमी होणार असला तरी विक्री कर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलामध्ये वाढ होणार आहे. तपासणी नाक्यावर अधिकारी, रोखपाल हे आरटीओ कार्यालयाचे असणार आहेत. इतर सर्व कामे करणारी यंत्रणा आणि व्यक्ती हे त्या कंपनीचे असणार आहेत. सध्या असलेल्या तपासणी नाक्यावर आठ अधिकारी व चार रोखपाल काम करतात. नव्याने सुरु होणा-या नाक्यावर बारा अधिकारी व आठ रोखपाल लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाहनाना टॅग लावण्याचे काम सुरु असून या तपासणी नाक्यातून येणा-या प्रत्येक वाहनाला टॅग लावण्यात येणार असल्याचेही वळीव यांनी सांगितले.

(* साभार : दै. पुढारी)