उस्मानाबाद -: जिल्‍ह्यातील दुष्‍काळी परिस्थितीच्‍या पार्श्‍वभूमीवर विवाह सोहळ्यासाठी अवास्‍तव खर्चाला आळा घालण्‍यासाठी गरजूवंत वधु-पित्‍याच्‍या मदतीसाठी येथील तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज शनिवार दि. 18 मे रोजी लेडिज क्लब, उस्मानाबाद येथे सायंकाळी 6.44 वाजणाच्‍या मुहुर्तावर 27 जोडप्‍यांच्‍या भव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्‍यात आले आहे.
    दुष्काळी परिस्थितीत सर्वसामान्य पालकांना लग्न सोहळ्याचा खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे. यात वधु-वरांना पोशाख, संसारोपयोगी साहित्य देण्यात येणार आहे. या विवाह सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून, 20 हजार वर्‍हाडी मंडळींचे नियोजन केले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व जनतेने वधू-वरास शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केले आहे.
 
Top