बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शासनाकडून दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर राबविण्‍यात येणा-या तातडीच्‍या मदतकार्यासाठी अत्‍यावश्‍यक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन सेवा म्‍हणून 17 गटांची नेमणूक करण्‍यात आली. यामध्‍ये तांत्रिक अधिकारी म्‍हणून शाखा अभियंता अथवा मंडल कृषी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी म्‍हणून मंडल अधिकारी, कृषी मंडल अधिकारी यांची नेमणूक केली. यातील 17 गटांपैकी केवळ 7 गटांचे अहवाल बार्शी तहसिलमध्‍ये सादर करण्‍यात आल्‍याने मुख्‍यमंत्र्यासमोर होणा-या बैठकीत अहवाल सादर करण्‍यापूर्वी नूतन तहसिलदारांची कोंडी झाली.
    दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर शासनाच्‍या धोरणानुसार अनेक गावांचे सर्वेक्षण करुन योग्‍य त्‍या ठिकाणी मदतकार्य करण्‍यासाठी उपाययोजना आखण्‍यात आली. सोलापूर जिल्‍ह्यातील जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडूनही बार्शी तालुक्‍यातील भीषण टंचाई परिस्थितीबाबत धोरण आखण्‍यात आले व सुचनेनुसार आदेश देण्‍यात आले. दुष्‍काळाच्‍या परिस्थितीत सावधगिरी बाळगून शासनाच्‍या उपाययोजनांसाठी गावतील परिस्थितीचा प्रत्‍यक्ष पाहणी करुन अंदाज घेण्‍यासाठी परिशिष्‍ठाप्रमाणे गट तयार केले व त्‍यांना नेमून दिलेल्‍या गावात भेटी देऊन अहवाल सादर करण्‍याचे आदेश देण्‍यात आले. याकरीता 17 गटांची नियुक्‍ती करण्‍यात आली. यामध्‍ये तांत्रिक अधिकारी म्‍हणून शाखा अभियंता अथवा मंडल कृषी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी म्‍हणून मंडल अधिकारी अथवा कृषी अधिकारी यांची नेमणूक केली. टंचाई संपर्क व निवारण गटाच्‍या नेमलेल्‍या कामात प्रत्‍येक आठवडयास नेमून दिलेल्‍या तारखेस जाऊन गावक-यांशी, ग्रामपंचायत सदस्‍यांशी चर्चा करुन गावपातळीवरील अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनाही बोलावणे, बैठकीत शक्‍यतो वेळ निश्चित करुन लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील याची दक्षता घेणे, गावातील मोक्‍याच्‍या ठिकाणी नोटीस बोर्डवर सूचना लिहून ठेवणे, बैठकीतील चर्चेत पाणी टंचाई, चाराटंचाई, महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण आरोग्‍य हमीची कामे, टंचाई निवारणाची कामे व इतर अनुषंगीक कामांचा उल्‍लेख आहे. उपाययोजनांसाठी गावक-यांना अवगत करणे, अंमलबजावणीसाठी प्रयत्‍न करणे, कार्यपूर्तीचा अहवाल अभिप्रायासह तहसिलदार यांच्‍याकडे देण्‍याबाबत सूचनाही देण्‍यात आल्‍या. प्रत्‍येक बैठकीची इतिवृत्‍त नमुन्‍यामध्‍ये तयार करुन तहसलि कार्यालयास त्‍याची प्रत देणे बंधनकारक होते. यामध्‍ये कसून करणारांवर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिनियम 2005 मधील कायदेशीर कारवाई करण्‍यात येणार असेही पत्रात सांगण्‍यात आले.
    विविध गावानुसार 17 गटांची नियुक्‍ती करण्‍यात आली असून त्‍यामध्‍ये गट 1 मध्‍ये प्रशासकीय अधिकारी पी.डी. देवधरे, तांत्रिक अधिकारी ए.एस. वसेकर, गट 2 मध्‍ये एस.ए. हिंगणे, पी.व्‍ही. घाणेकर, गट 3 मध्‍ये एस.एस. मुंढे, एस.आर. कुंभार, गट 4 मध्‍ये व्‍ही.के. कशाळे, आर.बी. धोत्रे, गट 5 मध्‍ये व्‍ही.डी. मुडके, एम.एम. सोनवणे, गट 6 मध्‍ये एस.एच. जमादार, एस.के. पाटील, गट 7 मध्‍ये एस.एम. झोळ, एस.ए. सुरवसे, गट 8 मध्‍ये एम.एन. मांजरे, झालटे, गट 9 मध्‍ये एम.पी. भेरे, डी. लोंढे, गट 10 मध्‍ये ए.एम. पटेल, वाय.ए. वलेकर, गट 11 मध्‍ये ए.एस. साठे, काळे, गट 12 मध्‍ये के.व्‍ही. आळणे, एस.व्‍ही. सोनवणे, गट 13 मध्‍ये जी.एस. बेले, व्‍ही.के. लोंढे, गट 14 मध्‍ये एस.आर. चव्‍हाण, एस.जे. नाईकवाडी, गट 15 मध्‍ये डी.ए. राऊत, एस.एस. सुरवसे, गट 16 मध्‍ये ए.एल. कांबळे, एस.यु. उबाळे, गट 17 मध्‍ये एम.व्‍ही. ग्रामपाध्‍ये, एम.के कापसे यांची नेमणूक करण्‍यात आली. यापैकी गट 2, 4, 5, 8, 10, 12, 13 या 7 गटांची एप्रिल अखेरची माहिती तहसिलमध्‍ये जमा झाली असून उर्वरित 10 गटांच्‍या तांत्रिक अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्‍याकडून माहिती उपलब्‍ध नसल्‍याने तहसिलदार सोमवंशी यांनी चौकशीचे आदेश दिले.
 
Top