बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील पेशवा युवा मंचच्‍यावतीने 65 बटूंचे सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्‍न झाला. मागील पाच वर्षापासून व्रतबंध सोहळा, वधू-वर परिचय मेळावा, शेतकरी मेळावा, गुणवंतांचा सत्‍कार, शहरातील विविध समाजोपयोगी कार्यात पेशवा युवा मंचचा सहभाग राहिला आहे. मागील दोन वर्षापासून सामुदायिक व्रतबंधाचे कार्य सुरु केल्‍याने अनेक दूरदरच्‍या ठिकाणाहून समाजातील व्‍यक्‍तींनी सहभाग नोंदविला असून बार्शीचे नाव राज्‍यभर पसरले आहे. अशा प्रकारचे कार्य इतर गावातही होणे गरजेचे असल्‍याने त्‍यांचा आदर्शन घ्‍यावा व समाजासाठी मोलाचे योगदान ठरलेले कार्य पुढे नेण्‍याचा प्रयत्‍न करावा, असे सर्वजण सहजासहजी म्‍हणत होते.
    सद्यस्थितीतील दुष्‍काळाच्‍या पार्श्‍वभूमीवर अनावश्‍यक खर्चाला आळा घालून अत्‍यावश्‍यक विधी योग्‍य त्‍या पध्‍दतीने करत सामुहिक व्रतबंध केल्‍याने अनेकांचा मोठा खर्च वाचत असून त्‍याचा समाजाला चांगला उपयोग होत आहे.
    या कार्यक्रमासाठी उस्‍मानाबादचे खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, आ. दिलीप सोपल, उपनगराध्‍यक्ष राहुल कोंढारे, सोनारी देवस्‍थानचे संजय पुजारी, उत्‍ताराधिकारी मठ बेंगलोरे श्री श्री सत्‍यात्‍मतीर्थ स्‍वामी यांच्‍या लातूर मठाचे मठाधिपती पंडित वामनाचार्य जोशी यांच्‍यासह बार्शी शहरातील प्रतिष्ठित नागरीक मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
    पंडित वामनाचार्य स्‍वामी बोलताना म्‍हणाले की, जन्‍मापासून होणा-या सोळा संस्‍कारापैकी हा महत्‍त्‍वाचा संस्‍कार असून या मौजीबंधन सोहळ्यानंतरच बटूंना गायत्री मंत्र व संध्‍या केल्‍याचे महत्‍व असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
    कार्यक्रमानंतर शहरातील प्रमुख मार्गावरुन सवाद्य मिरवणुकीमध्‍ये रथामध्‍ये बटूंना बरोबर घेऊन कासारवाडी येथील योग विज्ञान आश्रमातील अश्‍वमेध यज्ञातील अश्‍व, हत्‍ती, बग्‍गी यांच्‍यासह सवाद्य सुमधून वाद्यांमध्‍ये मोठ्या संख्‍येत समाजासह मिरवणूक काढण्‍यात आली. कार्यक्रमासाठी सर्व समाजबांधवानी एकत्रितपणे कार्य करुन सोहळा यशस्‍वी केला.
 
Top