बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: अल्‍पावधीत लोकप्रिय झालेल्‍या व सामाजिक क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य केलेल्‍या राजेंद्र मिरगणे यांना अज्ञाताकडून धमकी येत असल्‍याने बार्शीतील राजकीय वातावरणात संभ्रमावस्‍था निर्माण झाली आहे.
    सदरच्‍या धमकीसाठी वापरण्‍यात आलेला कॉईनबॉक्‍सचा क्रमांक हा उस्‍मानाबाद विभागातील आहे. तसेच यातील दुसरा मोबाईल क्रमांकाबाबत पोलीसांचा शोध सुरु आहे. राजेंद्र मिरगणे हे स्‍वतः उत्‍तम अभियंते असून त्‍यांचा चांगल्‍या प्रकारचा बांधकाम व्‍यवसाय आहे. त्‍यांचे अभियांत्रिकी महाविद्यालय, अद्ययावत शॉपींग कॉम्‍प्‍लेक्‍स, बार्शीतील सर्वात उंच इमारतीचे निर्माते व बार्शी शहराच्‍या वैभवात भर टाकणा-या सिमेंट रस्‍त्‍याचे कामही त्‍यांच्‍याकडे आहे. आजपर्यंत राज्‍यस्‍तरीय कबड्डी स्‍पर्धा, बुध्‍दीबळ स्‍पर्धा, युवा महोत्‍सवृ दुष्‍काळग्रस्‍तांना मोफत पिण्‍याचे पाणीपुरवठा, स्‍वखर्चातून गावचा रस्‍ता, सामुदायिक विवाह सोहळा, विविध जयंत्‍या, पुण्‍यतिथामधील लक्षणीय सहभाग इत्‍यादी सामाजिक कार्यात मिरगणे यांनी आपला वेगळा ठसा उमटविला असून येणा-या लोकसभा मतदार संघातील उमेदवार म्‍हणून त्‍यांच्‍या नावावरच शिक्‍कामोर्तब होणार असल्‍याची चर्चा वरिष्‍ठ पातळीवरुन सुरु आहे.
    कदाचित यामुळेच तर त्‍यांच्‍यापासून आपल्‍या कोणालातरी धोका पोहचतो म्‍हणून कोणी फोनवर धमकावले की, ज्‍याला धोको पोहाचतो त्‍यानी फोनव धमकावण्‍याला कोणालातरी सांगितले याबाबत तर्कवितर्क सुरु आहेत. मिरगणे यांचे राष्‍ट्रवादीतील सर्व नेत्‍यांबरोबर तसेच अजित पवार यांचे असलेले घनिष्‍ठ संबंध यामुळे आणखीनच राजकीय समिकरणाला दुजोरा मिळत आहे. सदरच्‍या धमकी देणाराने राजकारणात येऊ नये, अन्‍यथा बरे वाईट होईल, असे सांगत धमकी दिली आहे. सदरची धमकी गांभिर्याने घ्‍यायची की कोणी चेष्‍टामस्‍करी केली म्‍हणून दुर्लक्ष करायचे याबाबत सतर्क राहण्‍याची गरज आहे. पोलीस सदरच्‍या इसमाचा शोध घेत असून सध्‍या तरी त्‍याचे नाव समजू शकले नाही.
 
Top