आज इंटरनेटवर बसलं की कोणतीही माहिती अगदी क्षणार्धात आणायची किमया ''गुगल'' हे सर्च इंजित करत असतं. किंबहुना सर्च म्हणजे 'गुगल' हे समीकरणच झालंय ना? आपण नाही का म्हणत, कोणत्याही गोष्टीची माहिती मिळत नसेल तर अरे, त्यात काय आहे 'गुगल' वर पहा ना. पण सर्च इंजिनमध्ये क्रांती घडवणा-या या 'गुगल'ला हेच नाव का मिळालं माहित आहे? किंवा त्याचा अर्थ काय माहित आहे? नाही ना, मग आपण जाणून घेऊयात,
'गुगल' चे संस्थापक सर्गेई आणि लॉरी यांनी 90 च्या दशकात अशा एक सर्च इंजिनची रचना करायला घेतली ज्याची कार्यपध्दती अगदी सोपी असेल. युजरने त्याचा सर्च टाकला की, त्याला संबंधित वेबसाईटपर्यंत नेणारी एक यंत्रणा ते तयार करत होते. त्याचं प्रारंभीचं नाव त्यांनी ठेवलं बॅकरब. त्याला साजेसा लोगोही लॅरीनं तयार केला. आपल्या डाव्या हाताचा पंजा स्कॅनरवर ठेवून तो ब्लॅक अँन्ड व्हाईटमध्ये स्कॅन केला आणि झाला त्याचा लोगो तयार. पण या नावात त्यांना काही दम वाटेना. पुढे त्यांचा एक सल्लागार शॉन अँडरसन यानं त्यांना 'गुगल प्लेक्स' हे नाव सुचवलं. त्याचा अर्थ होता एक या अंकावर शंभर शून्य दिल्यावर तयार होणारी महाकाय संख्या. लॅरीला हे नाव आवडलं पण त्याने त्यात एक छोटासा बदल केला 'गुगल प्लेक्स' ऐवजी नुसतं 'गुगल' केलं. म्हणजे म्हणायला सोपं आणि सुटसुटीत. त्यांचं एकमत झालं आणि लॅरीने हे नाव रजिस्टरही करुन आणलं GooGle.com. पण इथे एक गोची झाली की त्यानं जे नाव रजिस्टर केलं त्याचं स्पेलिंग चुकलं होतं. त्यांना स्पेलिंग हवं होतं, Googol. पण आता नाव रजिस्टर झाल्यावर ते बदलण्याचं कोणी फारसं मनावर घेतलं नाही आणि आजच्या 'गुगल' या सर्च इंजिनचा जन्म झाला. 'गुगल' वर झटपट माहिती आणि फोटो तर मिळतातच पण त्याची आणखी एक खासियत आहे ती म्हणजे त्याचं होमपेज. ते आकर्षक असावं हा कटाक्ष लॅरीचा असतो. पण त्याचवेळी ते वेगवेगळ्या दिवसांची माहिती सांगणारं असावं याकडेही त्याचं लक्ष असतं. म्हणूनच कोणत्याही खास जागतिक दिनी 'गुगल' वर सर्च करणा-यांना 'गुगल' या नावात काहीतरी अँनिमेशन करुन त्या खास दिवसाची आठवण करुन दिली जाते. अनेकांनी आपलं होमपेज म्हणून 'गुगल'ची निवड केली आहे, ती याच कारणासाठी.