कोल्हापूर -: रायगडावर गुरुवार दि. 6 जून रोजी होणा-या 340 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास देशभरातून शिवभक्त, इतिहासप्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. यानिमित्ताने दि. 5 व 6 जून रोजी गडावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक उत्सव समितीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती समितीचे अध्यक्ष इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य निर्माण करुन छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दि. 6 जून 1674 रोजी रायगडावर अभिषेक करुन मराठा साम्राज्याला अधिपती दिला. संपूर्ण जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी ही घटना म्हणजे तत्कालीन भारताचा पहिला स्वातंत्र्यदिन म्हणावा लागेल. अशा या इतिहासाच्या स्मृती जपण्याच्या उद्देशाने अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे सोहळ्याचे आयोजन केले जाते. समितीचे मार्गदर्शक संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकारामुळे या सोहळ्यास लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले असून हा सोहळा राष्ट्रीय सण म्हणून साजरा व्हावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
दि. 5 जून रोजी गडपूजनाने शिवराज्याभिषेक महोत्सवाची सुरुवात होईल. शिवकालीन युध्दकला, शिवशाहिरांचे पोवाडे, इतिहास विषयक चर्चासत्र असे कार्यक्रम होतील. दि. 6 जून रोजी पहाटे ध्वजारोहण आणि आणि सकाळी दहा वाजता राजसदरेवरील शिवछत्रपतींच्या पुतळ्यावर संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते अभिषेक होईल. यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात येईल. राजसदर, होळीचा माळ, बाजारपेठ, शिवसमाधी असा हा पालखी मिरवणुकीचा मार्ग असेल. यावेळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनी उपस्थित राहणार आहेत. उत्सवाची सांगता मोफत अन्नछत्रातील महाप्रसादाने होईल. सुमारे 70 हजार लोकांच्या अन्नछत्राचे आयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेस फत्तेसिंह सावंत, हेमंत साळोखे, प्रवीण हुबाळे, उदय घोरपडे, प्रसन्न मोहिते, अमर पाटील, अवधूत पाटील, राहुल भोसले, अमित अडसुळे, शिवशाहीर रंगराव पाटील, संजय बागल आदी उपस्थित होते.
कोल्हापूरातुन 4972 जणांची नोंदणी
सोहळ्यासाठी अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवभक्तांना अत्यल्प खर्चात रायगडावर नेण्याची सुविधा करण्यात आली आहे. यासाठी करण्यात आलेल्या आवाहनानुसार मंगळवारपर्यंत 4972 लोकांनी अर्ज भरले आहेत. उर्वरित दोन दिवसांत अजून दोन-तीन हजार शिवभक्तांची नोंदणी होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

* सौजन्य - दै.पुढारी