उस्मानाबाद :- पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन होणे आवश्यक आहे. प्रत्येकांने आपल्या अंगणात, परिसरात एक व्यक्ती एक झाड लावून वृक्षसंवर्धन करुन पर्यावरणाचा समतोल साधावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी केले.
        येथील हजरत खाजा शमशोदीन गाझीरहे यांच्या  उरुसानिमित्त  दर्गा मैदानावर सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने माफक दरात रोपविक्री स्टॉल्स उभारण्यात आला आहे. त्याचे उदघाटन डॉ. नागरगोजे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक आर. एम. शेख यांच्यासह वनीकरण विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
    उदघाटनप्रसंगी डॉ. नागरगोजे पुढे म्हणाले की, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्याने टंचाई सध्‍यस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरत आहे. तेंव्हा नागरीकांनी वृक्षसंगोपनाचे महत्व लक्षात घेवून जिल्हयात जास्तीत जास्त  प्रमाणात वृक्षलागवड करावी  व सामाजिक वनीकरणाअंतर्गत सुरु असलेल्या रोप वाटपाच्या कार्यक्रमात सक्रीय व्हावे.
    प्रारंभी आर.एम. शेख यांनी उरुसातील भक्ताना व शालेय विद्यार्थ्यांना अतिशय कमी दरात  चिंच, आंबा, जांभुळ,आवळा आदि विविध प्रकारचे रोपे व सोबत प्रचार प्रसिध्दी कार्यक्रमांतर्गत 50 हजार घडिपत्रिकेचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
    यावेळी सामाजिक वनीकरणाचे विभागाचे अधिकारी व कर्मचारी, लागवड अधिकारी बारस्कर आदि उपस्थित होते.   
 
Top