उस्मानाबाद :- जिल्ह्यात टंचाई निवारणार्थ जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. भूजल सर्व्हेक्षण, कृषी, पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, सामाजिक वनीकरण आणि वन विभागाच्यावतीने विविध कामे हाती घेतली गेली आहेत. कृषी विभागाच्यावतीने संपूर्ण जिल्हयात 205 गावात शेतक-च्या शेतात मशिनच्या सहाय्याने बांध बंदिस्ती करण्याचा उपक्रम हाती घेतला असून आजपर्यंत जिल्ह्यातील 44 गावात या उपक्रमांव्दारे जवळपास 25 हजार हेक्टर क्षेत्रावर बांध बंदिस्तीची कामे पूर्ण झाली आहेत.   
    शेतक-यांच्या शेतात गट नंबरमधील एकुण क्षेत्रावर बांध बंदिस्ती करण्यात येत आहे. शेताला बांध बंदिस्ती केल्याने  पावसाचे पाणी शेतातून बाहेर जात नाही तसेच शेतातील मातीही वाहून जात नाही. हा फायदा लक्षात घेवून कृषी विभागाने मोठ्या प्रमाणावर बांधबंदिस्तीची कामे हाती घेतली. 156 मशीनच्या माध्यमातून कंपार्टमेंट बंडींगचे कामे करुन घेतली गेली. यापूर्वी  तुळजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. सध्या कळंब तालुक्यात 30 मशिनच्या माध्यमातून 14 गावात 27 कामे सुरु आहेत. उस्मानाबाद तालुक्यात 52 मशिनच्या माध्यमातून 26 गावात 25 कामे सुरु असून उमरगा तालुक्यात 44 मशीनच्या माध्यमातून 5 गावात 13 कामे सुरु आहेत. जिल्हाभरात एकुण 65 कामे चालू आहेत. या माध्यमातून 25 हजार हेक्टर क्षेत्रावर बांध बंदिस्ती करण्यात आली आहे.
    या जलसंधारण कामांमुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे. याशिवाय जलस्त्रोतांचीही पाणीपातळीही  वाढण्यास मदत होणार आहे. शेतक-यांन या बांध बंदिस्तीमुळे आपल्या शेतातील वाहून जाणारे पाणी या बांधबंधिस्तीमुळे आपल्याच शेतातच अडवून जिरवण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. पावसाळा तोंडावर आल्याने ही कामे वेगाने पुर्ण करण्यासाठी शेतकरी वर्गाची लगबग सुरु आहे.
 
Top