उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, उस्मानाबाद यांच्यावतीने उस्मानाबाद येथे सर्वसाधारण घटक योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक -युवतीसाठी मोफत घरगुती उपकरणे, दुरुस्ती व मोटार रिवायंडीग प्रशिक्षण दि. 1 ते 30 जुनपर्यत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी इच्छूक युवक-युवतीनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी कार्यक्रम समन्वयक अर्चना माळी, मो. 9822671421 यांच्याशी संपर्क संपर्क साधावा. तसेच  दि. 30 मे 2013 रोजी उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीव्दारे निवड करण्यात येणार आहे, असे आवाहन एम.सी.ई.डी.चे  कनिष्ठ  प्रकल्प अधिकारी, यांनी केले आहे.                               
 
Top